मुखपृष्ठ
द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर

माझे शेल्फ

द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर

इंग्रजी शीर्षक
The Accidental Prime Minister
सारांश

द ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर या संजय बारु यांच्या पुस्तकामध्ये, डॉक्टर मनमोहन सिंग यांचे चित्रदर्शी आणि ओघवत्या शैलीत त्यांच्या प्रत्येक कामाचे प्रसंगाचे चित्रीकरण केलेले आहे. त्याद्वारे लेखकाने सरकारचा कारभार कसा चालतो? नेत्यांचे जन- माणसासमोरविशिष्ट प्रतिमा कशी उभी केली जाते.? राजकारण्यांच्या कृतीमागे कोणत्या प्रेरणा असतात.? ते प्रसारमाध्यमांचा स्वतःच्या स्वार्थासाठी कसा वापर करून घेतात.? याचा पट वाचकांसमोर त्यांनी उलगडून दाखवला आहे. दिल्लीच्या घडामोडींकडे नजर लावून बसलेल्यांना रंजक वाटतील असे अनेक छोटे-छोटे किस्से सुद्धा यात आहेत. अणू कराराच्या संदर्भात पंतप्रधानांच्या आणि त्यांच्या अधिकाऱ्यांच्या देशांतर्गत तसेच अमेरिकेतील मुद्द्यांशी ज्या अनेक चर्चा झाल्या. त्याचप्रमाणे डॉक्टर सिंग यांच्या पाकिस्तानशी वेळोवेळी झालेल्या वाटाघाटी, इतिहासकारांना अत्यंत मौल्यवान वाटतील यात शंकाच नाही. अशा प्रकारच्या माहितीचा खजिनाच लेखकाने या पुस्तकातून वाचकांसाठी खुला केला आहे.२००४ मध्ये संजय बारु यांनी ‘फायनान्शियल एक्स्प्रेस’ या दैनिकाचा मुख्य संपादक म्हणून आपली कारकिर्द मागे सोडून युपीए-१ मध्ये पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे ‘माध्यम सल्लागार’ म्हणून रुजू होण्याचा निर्णय घेतला. सिंग यांनी त्यांना ही नोकरी देताना असं म्हटलं होतं, ‘‘या कार्यालयात बसून माझा बाहेरच्या जगाशी फारसा संबंध येणार नाही. तुम्ही माझे डोळे आणि कान व्हावं, अशी माझी इच्छा आहे. माझ्या जे काही कानावर पडावं, असं तुम्हाला वाटत असेल, ते अजिबात न घाबरता, नि:पक्षपाती वृत्तीनं जसं असेल तसं मला सांगा!’’ ‘द अॅक्सिडेन्टल प्राइम मिनिस्टर’ या पुस्तकामध्ये डॉ. सिंग यांच्याविषयीचं जनमत बनवणं हा अनुभव काय होता, हे त्यांनी सांगितलं आहे. पडद्यामागे घडणा-या भारतीय राजकारणाची नवीन दृष्टी त्यांनी आपल्या खिळवून टाकणा-या शैलीत वाचकाला दिली आहे. डॉ. सिंग यांचे ‘स्पिन डॉक्टर’ आणि चार वर्षं खास त्यांच्या विश्वासातले असलेल्या संजय बारु यांनी डॉ. सिंग यांचे त्यांच्या मंत्र्यांशी असलेले तणावपूर्ण संबंध, सोनिया गांधी यांच्याबरोबर असलेलं त्यांचं सावध समीकरण अगदी जवळून पाहिलं आहे. डाव्या पक्षांना हाताळतानाचं आणि अणुकराराचा पाठपुरावा करतानाचं डॉ. सिंग यांचं कौशल्यही त्यांनी पाहिलं आहे. ज्या सरकारमध्ये दोन सत्ताकेंद्रं होती, अशा सरकारमध्ये काम करणं, डॉ. सिंग यांच्यासाठी किती कठीण काम होतं, याचं समग्र दर्शन या पुस्तकातून संजय बारु यांनी घडवलं आहे. वाचकाला एक नवी दृष्टी देणारं संजय बारु यांचं हे पुस्तक, भारतीय राजकारणातील ‘आतल्या गोटातील’ माहिती सांगणारं आहे. हे पुस्तक डॉ. मनमोहन सिंग यांच्या युगाचा एक सुंदर आलेख आपल्यासमोर ठेवतं.

संघर्षात अफलातुन थंडपणा दाखवणारा मार्क! ‘पैसा हेच स्वातंत्र’ हे ब्रीदवाक्य पाळुन अडचणींमध्येही नवनवे रस्ते शोधुन, पैशाच्या पाईपलाईन आपल्या घरापर्यंत आणणारा मार्क! अमेरीकन कोर्टाने, एका रात्रीत, आपली हजारो-कोटी रुपयांची संपत्ती गोठवल्यावर, आभाळ फाटलेलं असताना, शांत आणि गंभीरपणे पुढच्या प्रत्येक अडचणीला थंड डोक्याने सामोरे जाणारा, मार्क रीच! प्राणप्रिय पत्नी जेव्हा उभा दावा मांडते, सार्वजनिक रीत्या बदनाम करते, लाडकी मुलगी जीव सोडते, निष्ठावान अधिकारी कंपनी सोडतात, एकेकदा मांडलेले डाव आणि व्यापारात घेतलेली जोखीम आर्थिक दृष्ट्या उद्ध्वस्त करते, तेव्हा प्रत्येक वेळी राखेतुन झेप घेणारा मार्क रीच! आपल्या इस्राईली ज्यु लोकांच्या मदतीने, प्रत्येक वेळी, अमेरीकन गुप्तहेर कंपन्याच्या गुप्तहेरांना, गुंडाना आणि पोलिसांना गुंगारा देऊन, त्यांच्या बिंत्तंबातम्या मिळवणारा मार्क रीच! आणि सर्वांवर कळस म्हणजे केवळ आपल्या बुद्धीमत्तेच्या आणि कल्पनातीत अशा धाडसी खेळींनी जगातला सर्वात श्रीमंत तेल आणि धातु व्यावसायिक बनलेला मार्क रीच! हे चरित्र वाचताना धीरुभाई अंबानींची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. एक माणूस भ्र्ष्ट राजकारणी आणि बाबुशाही, प्रसिद्धीला वखवखलेली मिडीया, आरोग्याच्या अडचणी आणि कौटुंबिक वाद ह्या प्रत्येक आव्हानाचा हसत हसत सामना करतो, आणि नानाविविध क्लृप्त्या वापरुन, दुसर्या हाताने धन, संपत्ती, पैसा वाढवत राहतो. त्याचा हा संघर्ष वाचला की आपल्यातला मार्क रीच ही जागा होतो, हेच ह्या पुस्तकाचं यश आहे.

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
समुदायाने जोडले
बंद