मुखपृष्ठ
द अल्टिमेट हॅपिनेस प्रिस्क्रिप्शन

माझे शेल्फ

द अल्टिमेट हॅपिनेस प्रिस्क्रिप्शन

इंग्रजी शीर्षक
The Ultimate Happiness Prescription
सारांश

जीवनाचा हेतू्च आनंदाचा विस्तार करत जाणे आहे. प्रत्येक ध्येयाचे ईप्सित आनंदप्राप्ती हेच असते. या आनंदातून अंतिमत: मोक्ष मिळावा अशीही प्रत्येकाची इच्छा असते. या पुस्तकाचे लेखक दीपक चोप्रा यांनी आनंदप्राप्तीसाठी सात गुरुकिल्ल्या (अर्थात सात सहजसुलभ मार्ग) वाचकांच्या हाती दिल्या आहेत. या सात गुरुकिल्ल्या आहेत - स्वत:च्या शरीराचा परिचय करून घ्या, तुमच्या खऱ्या आत्मविश्वासाचा शोध घ्या, तुमच्या जीवनातून अशुद्ध तत्त्व काढून टाका, बरोबर असणं सोडून द्या, वर्तमानावर लक्ष केंद्रित करा, स्वत:मध्ये जग पाहा, मोक्षप्राप्तीसाठी जगा. या सातही मार्गांचे लेखकाने सविस्तर विवेचन केले आहे. दैनंदिन जीवनात त्याचा वापर करून प्रत्येकजण आनंदी होऊ शकतो. अशा प्रकारे सर्वजण सुखी झाल्याने अवघं जग (विश्व) आनंदमय होईल. हे पुस्तक वाचकांना भौतिक सुखांच्या पलीकडचा आनंद कसा मिळवायचा याचे विस्तृत मार्गदर्शन करते.

आता पूर्वीपेक्षा जास्त माहिती व पैसा उपलब्ध असल्याने नेट कोरुंबाहून पेंटॅनलला आपले ब्राझीलमधील जुने सहकारी व एक अद्ययावत विमान घेऊन जातो. तेथे गेल्यावर गावकरी, गावचा मुखिया यांच्याद्वारे त्यांचे अत्यंत थंडपणाने स्वागत होते किंवा जवळजवळ येथे का आलात? अशीच त्यांची प्रतिक्रिया असते. नेट भांबावतो. पण चौकशीअंती रॅचेल काही काळापूर्वी मृत्यू पावल्याचे त्याला समजते. मुखिया तिच्या झोपडीजवळ नेटला नेतो. तेथे नेटला काही कागद मिळतात. त्यापैकी एक रॅचेलचे कायदेशीर मृत्युपत्र असते. मृत्युपत्राद्वारे ती मिळणारी संपत्ती नाकारत नाही. तर त्याचा एक ट्रस्ट बनवून मिळणारे उत्पन्न जगात आदिवासी कल्याण संघाचे काम चालू ठेवणे, खिस्ताच्या शिकवणुकीचा जगभर प्रसार करणे, आदिवासींच्या अधिकारांची जपणूक, भुकेलेल्यांना अन्न, रुग्णांना औषधे, लहान मुलांचे योग्य पोषण यासाठी वापरावी, ट्रस्टचा प्रमुख म्हणून नेट ओ रॉयले यांना नेमावे अशी इच्छा व्यक्त करते. अनुवाद फार सुरेख जमला आहे. भाषा प्रवाही व सोपी आहे. पण आशयाला कोठेही धक्का लागलेला नाही. जरूर वाचावी अशी कादंबरी.

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
समुदायाने जोडले
बंद