माझे शेल्फ
द अफगाण
रेड फ्लॅग नोटीस जारी केलेल्या फोनवरुन केला गेलेला एकच फोन. छापा मारल्यावर लॅपटाॅप हातात पडु नये म्हणुन त्याची मोडतोड करायचा प्रयत्न, स्वत: पकडले जाऊ नये म्हणुन चौथ्या मजल्यावरुन घेतलेली उडी— ब्रिटीश आणि अमेरिकन इन्टेलिजन्स एजन्सीजची एवढीच खात्ी पटते की, जगाला थक्क करेल अशा भयानक घातपाताचा कट अल् कायदाने रचला आहे. पण तो कोणत्या स्वरुपाचा आहे, कधी घडणार आहे. आणि लक्ष्य काय आहे याचा थांगपत्ता लागत नाही. अल् कायदा मधे स्वत:चा माणुस घुसवून कुठल्याही तर्हेची माहिती काढणे आजपर्यत त्यांना कधीही जमलेले नाही. अफगान आहे इजमत खान, ग्वाटेनामो बे इथे पाच वर्षे तुरुंगात असलेला तालिबान कमांडर—आणि अफगान आहे इराकमधे जन्मलेला, पंचवीस वर्षे जगाच्या कानाकोपर्यात लढल्यागेलेल्या युद्धाचा अनुभव असलेला कर्नल माईक मार्टीन. जबरदस्त पुर्वतयारी आणि दैवावर भरवसा ठेऊन, जिथल्या भीषण गोष्टींची कल्पना करणेही केवळ अशक्य आहे. अशा अंधार्या अरब जगतात अरब म्हणून—इझमत खान म्हणून—वावरत कर्नल माईक मार्टीन त्या कटाचा छडा लावू शकेल ???