मुखपृष्ठ
द गोल्डन राँदेव्हू

माझे शेल्फ

द गोल्डन राँदेव्हू

इंग्रजी शीर्षक
The Golden Rendezvous
सारांश

उत्कंठा वाढविणारी कादंबरी… अॅलिस्टर मॅक्लिन या इंग्रजी लेखकाच्या ‘द गोल्डन राँदेव्हू’ या कादंबरीचा अशोक पाध्ये यांनी मराठी अनुवाद केला आहे. एका बोटीवर एकाच आठवड्यात घडणाऱ्या घटनांचे चित्रण पाहायला मिळते. रोजनिशीचा भास निर्माण करणारी १२ प्रकरणे यामध्ये आहेत. यामधून कादंबरीचा नायक सर्व घटना-प्रसंगांचे वर्णन करतो. या कादंबरीतील घटना ‘एस. एस. कंपारी’ या बोटीवर घडतात. गर्भश्रीमंतांसाठी खास राखीव जागा असणाऱ्या या मालवाहू जहाजावरील कर्मचाऱ्यांचे अचानक होणारे गूढ मृत्यू, एका शास्त्रज्ञाचे त्यानेच बनविलेल्या क्षेपणास्त्रासहित पलायन, एस.एस. कंपारीचे दुसऱ्या एका १५ कोटी डॉलरचे सोने असलेल्या मालवाहू जहाजाला भिडणे अन् बोटीवर रचले जाणारे कारस्थान व चाचेरिगी, अशा विविध कथाबीजांनी युक्त अशी ही कादंबरी आहे. कादंबरीच्या सुरुवातीच्या निम्म्या भागापर्यंत खलनायकाचे वर्चस्व आहे; पण पुढे ते कमी कमी होत जाते आणि नायकाची सरशी व्हायला लागते. खलनायकाचा पराजय निश्चित होत असतानाच विजयश्री नायकाकडे पाठ फिरवते आणि वाचकाच्या मनावर प्रचंड दडपण येते. या बौद्धिक झुंजीमध्ये अर्थातच नायकाचा विजय होतो; पण तोपर्यंत वाचकाला प्रचंड मानसिक ताण सहन करावा लागतो. कादंबरी वाचताना पुढे काय होणार, हा प्रश्न वाचकाला अस्वस्थ करतो आणि पुस्तक खाली ठेवणे अशक्य होते. पाध्ये यांच्या गतिशील भाषाशैलीमुळे हा अनुवाद वाचकाला खिळवून ठेवतो. या उत्कंठावर्धक, रहस्यमय अशी अनुवादित कादंबरीतून बोटीवरील जीवनाचे दर्शन घडते. ‘द गोल्डन राँदेव्हू’च्या वाचनामुळे मराठी वाचकाच्या कक्षा नक्कीच रुंदावतील. अन् एका सकस वाङ्मयीन मेजवानीचा आस्वाद त्याला घेता येईल.

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
समुदायाने जोडले
बंद