माझे शेल्फ
द किस मर्डर
दिवसा पुरुष आणि रात्री स्त्री असे दुहेरी जीवन जगणारा एक अनामिक ट्रान्सव्हस्टाइल या कादंबरीचा कथानायक आहे. त्याच्या मालकीचा एक नाइट क्लब असतो. त्या नाइट क्लबमधील स्त्री वेषात नाचणाऱ्या एका मुलाचा खून होतो आणि हा नायक त्या खूनाचा शोध घेण्यासाठी डिटेक्टव्हच्या भूमिकेत शिरतो. प्रतिष्ठित उदोगपतींचे अडचणीत आणणारे फोटो आणि पत्रे यांच्या साहाय्याने ब्लॅकमेल करणाऱ्या एका षडयंत्री योजनेशी त्या खुनाचा संबंध असतो. क्लबमध्ये नाचणाऱ्या मुली त्यांचं खरं स्वरूप उघडं होऊन त्यांच्या नातेवाइकांत त्यांची नाचक्की होईल, या भीतीने घाबरून जातात. ‘द किस मर्डर’ या रोमांचकारी कादंबरीचे मूळ लेखक मेहमत मुरात सॉमर असून मराठी अनुवाद जयंत गुणे यांनी केला आहे. निखळ विनोदाची पखरण करत तुर्कस्थानातील गे लाइफचं सहानभूतीपूर्वक चित्रण करण्यात लेखक यशस्वी झाला आहे. एक चलाख, किंचित गर्विष्ठ आणि गुंतागुंतीचं व्यक्तिमत्त्व असलेला कथानायक सर्व संकटातून कसा तावूनसुलाखून बाहेर पडतो, हे औत्सुक्याचे आहे.मेहमत मुरात सॉमर यांच्या या धक्कादायक, उत्साहवर्धक आणि वाचकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवणा-या कादंबरीने रहस्यकथांच्या विश्वात खळबळ उडवून दिली. विनोद आणि रहस्याने भरलेली ही कादंबरी वाचनीय आहे.