मुखपृष्ठ
द लास्ट डॉन

माझे शेल्फ

द लास्ट डॉन

इंग्रजी शीर्षक
The last don
सारांश

कोणत्याही स्वरूपाची गुन्हेगारी, ही खरं तर जात, धर्म, प्रांत, देश या सगळ्या सीमा ओलांडून सगळ्या प्रकारच्या समाजात, पार इतिहासपूर्व काळापासून कमी-अधिक प्रमाणात अस्तित्वात असलेली सामाजिक प्रवृत्ती आहे.

हीच गुन्हेगारी जेव्हा संघटित स्वरूप धारण करते, तेव्हा मात्र ती त्या समाजाची, राष्ट्राची – फार कशाला, सार्या जगाची– डोकेदुखी बनते. आणि समाजाच्या दुर्दैवानं, ज्यांच्याकडे समाजानं न्यायदानाची अपेक्षा करायची, त्या न्याय संस्थेशी, राजकीय नेत्यांशी किंवा पक्षांशी जर अशा संघटित गुन्हेगारीनं हातमिळवणी केली, तर मात्र या डोकेदुखीचं रूपांतर अत्यंत झपाट्यानं कॅंन्सरमध्ये होतं.

सुसंघटित गुन्हेगारी, तीमध्ये गुंतलेली, प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या सहभागी असलेली ‘माणसं’, तिचे विविध पैलू, पदर, अंतप्रवाह, अंतर्गत कलह, त्या ‘माणसां’चे विविध मनोव्यापार, या सर्व गोष्टी जनसामान्यांपुढे उलगडून ठेवणारं जे काही लेखन जगभरात झालं आहे, त्यामध्ये जे एक नाव प्रामुख्यानं घेतलं जातं, ते म्हणजे प्रख्यात अमेरिकन लेखक मारिओ पुझो याचं.

प्रचंड व्यासंग आणि भरपूर संशोधन करून, ललित लेखनाच्या माध्यमातून; पण बर्याचशा वस्तुनिष्ठ पद्धतीनं, गुन्हेगारांना किंवा गुन्हेगारीला कुठंही देवत्व न देता किंवा त्याचं समर्थनही न करता मारिओ पुझोनं विलक्षण कौशल्यानं हे चित्रण केलेलं आहे.

‘द लास्ट डॉन’ ही मारिओ पुझोची नवी कादंबरीही संघटित गुन्हेगारीचंच भेदक चित्रण करणारी असली, तरी जाणत्या वाचकाला सावध आणि अंतर्मुख करणारी आहे.’

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
समुदायाने जोडले
बंद