माझे शेल्फ
द लास्ट गर्ल
द लास्ट गर्ल - नादिया मुराद (2018 नोबेल शांतता पुरस्कार विजेती, संयुक्त राष्ट्र संघाची पहिली सदिच्छादूत, इस्लामिक स्टेटला वंशहत्या आणि मानवताविरोधी गुन्ह्यांसाठी आंतररष्ट्रीय अपराध न्यायालयासमोर उभे करण्यासाठी प्रयत्नशील आहे.)* 2014 साली जेव्हा आयसिस ने "यजिदी" इराक-सिंजर- कोचोवर निव्वळ अल्पसंख्याक आणि आपल्या धर्मा व्यतिरिक्त अन्य धर्माच्या लोकांच्या वेगळ्या श्रद्धा मान्य नसण्याच्या कारणाने हल्ला करून संपुर्ण गाव, कुटुंब, नाती, घरं, शेती उद्ध्वस्त केली. तिच्या भावांसह आईला मारून टाकलं. गावातल्या सगळ्या पुरुषांना मारून, तरुण मुलींना "सबिय्या" केलं. संपूर्ण इराकभर त्यांना एका कडून दुसऱ्याकडे विकलं. मानसिक, शारीरिक, लैंगिक आत्याचार केले. मोसुल- इस्लामिक स्टेट, सुन्नी मुस्लिम कुटुंबाने जीवावर उदार होवुन तिची सुटका करण्यात तिला मदत केली. ती संपुर्ण घटना पुस्तकामध्ये आहे. तिच्यावर झालेले अत्याचार परत कुणावरही होऊ नये, असे आत्याचार झालेली ती शेवटची असावी म्हणून "द लास्ट गर्ल" पुस्तक वाचताना देशातल्या लोकशाहीचे महत्त्व कळते. पुस्तक वाचल्यावर आत्याचाराची दाहकता समजते, सगळी घटना डोळ्यासमोर उभी रहाते. अगदी अलीकडच्या काळातील ही घटना आहे. धर्माच्याआड दुसऱ्यावर आत्याचार करून, "आमचाच धर्म कित्ती चांगला सांगणं" मनाला पटत नाही. "माणुसकी" हाच धर्म आहे. आपण आपल्या धार्मिक अस्मिता गोंजारण्याआधी हे पुस्तक नक्कीच वाचल पाहिजे.