मुखपृष्ठ
द लॉस्ट सिम्बॉल

माझे शेल्फ

द लॉस्ट सिम्बॉल

इंग्रजी शीर्षक
The Lost Symbol
सारांश

जे हरवले आहे, ते कधीतरी सापडेलच! वॉशिंग्टन डी.सी.मधील हार्वर्ड विद्यापीठातील चिन्हशास्त्रज्ञ ( Symbologist ) रॉबर्ट लँग्डन याला शेवटच्या क्षणी ‘कॅपिटोल’ इमारतीमध्ये संध्याकाळी व्याख्यान देण्यासाठी निमंत्रित केले गेले. तथापि, त्याच्या आगमनानंतर काही वेळातच एक हादरवून सोडणारी वस्तू इमारतीच्या गोल भागात ( Rotunda) सापडली. त्यावरती पाच भेसूर चिन्हे काढलेली होती. ती वस्तू त्या गोल भिंती असलेल्या भागात मध्यभागी ठेवलेली होती. ते पाहताच लँग्डनला कळून चुकले की, निमंत्रण देण्याची ही एक प्राचीन पद्धत अवलंबिली गेली आहे. त्या निमंत्रणानुसार ती वस्तू स्वीकारणाऱ्याला एक निरोप मिळाला होता. फारच थोड्यांना कळू शकेल, अशा विद्येच्या दीर्घकाळ हरवलेल्या गुप्त जगात येण्यासाठी खुणावले गेले होते! लँग्डनचा मार्गदर्शक व गुरू असलेला पीटर सॉलोमन हा मेसन पंथातील एक अध्वर्यू व मानवतावादी होता. त्याला क्रूरपणे पळवून नेण्यात आले होते. त्याला सोडवून त्याचे प्राण वाचवण्यासाठी जे निमंत्रण दिले गेले आहे, ते स्वीकारणे एवढाच मार्ग आपल्या हाती आहे; मग पुढे काहीही होवो, हे लँग्डनला कळून चुकले. त्यासाठी लँग्डनला अमेरिकेच्या त्या सर्वांत सामर्थ्यशाली शहरात आता हिंडावे लागले. अनेक न पाहिलेली दालने, देवालये, चर्च व भुयारे यातून लँग्डनची शोधयात्रा सुरू झाली. या शहरातील ज्या-ज्या काही वास्तू त्याला ज्ञात होत्या, त्यांचे रूपांतर त्याला आता अंधाऱ्या व बनावट जगात झालेले दिसले. त्यामध्ये मोठ्या खुबीने भूतकाळ लपवून ठेवला होता. तसेच त्यात मेसन पंथाची गुपितेही ठेवलेली होती. पूर्वी कधीही पाहिली नाहीत, अशी सत्ये त्याला त्यातून उमगली व ती सर्व सत्ये एकच एक अविश्वसनीय सत्य दाखवित होते. झाकला गेलेला इतिहास, अगम्य प्रतिमा व अनाकलनीय संकेत यांनी मिळून एक भव्य पट विणला होता. लँग्डन त्याला जाऊन भिडला होता. ‘द लॉस्ट सिम्बॉल’ ही एक हुशारीने रचलेली व विजेच्या वेगाने घटना घडवणारी थरारक कादंबरी आहे. ती वाचताना प्रत्येक वळणावर वाचक थक्क होत जातो. शेवटी लँग्डनला कळून चुकते की, आपल्याला या गुपितापेक्षा जास्त धक्कादायक असे काहीही जगात सापडणार नाही.

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
समुदायाने जोडले
बंद