मुखपृष्ठ
द मिरॅकल

माझे शेल्फ

द मिरॅकल

इंग्रजी शीर्षक
The Miracle
सारांश

श्रद्धा व अंधश्रद्धेच्या झुल्यावर झुलवत ठेवणारी कांदबरी… श्रद्धा आणि अंधश्रद्धा हा विषय ज्या कादंबरीत प्रभावीपणे हाताळला आहे ती कादंबरी आहे. आयर्विंग वॅलेस यांची ‘द मिरॅकल’ ही जयवंत चुनेकर यांनी या कादंबरीचा मराठी अनुवाद केला आहे, शीर्षक मात्र तेच ठवले आहे. देव, धर्म, श्रद्धा-अंधश्रद्धा या संकल्पना वा भावना जगाच्या पाठीवर कुठंही गेलं तरी आढळताच आणि मानसिक हळवेपणाकडे झुकलेल्या या संकल्पनांचा ‘व्यापारा’साठी वापर करायची वृत्तीही सर्वत्र आढळते. ‘द मिरॅकल’ ही कादंबरी एका उत्कंठावर्धक सूत्राभोवती गुंफण्यात आली आहे. ‘येशू खिस्ताची माता पवित्र व्हर्जिन मेरी ऑगस्टमध्ये पुन्हा अवतार घेणार’ या भविष्यवाणीवर कॅथॉलिक धर्मगुरू पोप अधिकृत म्हणून शिक्कामोर्तब करतात. नेमलेल्या समितीचा निर्णय पत्रकार परिषदेत जाहीर करतात. या चमत्कारावर उमटलेल्या अनेकविध प्रतिक्रिया त्याभोवती कथानक गुंफले आहे. फ्रान्सच्या लूर्द या छोट्याशा गावातील एक किसानकन्यका बेर्नादत सुविस गावाबाहेरच्या गुहेत एकदा गेली असताना पवित्र व्हर्जिन मेरीचे तिला दर्शन होते. पवित्र मेरी तिला भेटीमध्ये तीन रहस्यपूर्ण गोष्टी सांगते व त्या गोष्टी गुप्तच ठेवण्याची अटही घालते. अगदी खुद्द पोपपासूनदेखील ही रहस्ये गुप्त ठेवायची. पण व्हर्जिन मेरीचं पवित्र दर्शन हिला झाले हे खरे कशावरून? तर यानंतर या साध्यासुध्या कन्येच्या देहाला एक दिव्य रूप प्राप्त होते. चेहरा स्वर्गीय तेजाने झळाळू लागतो. ओठांवरचे हास्य गूढरम्य असल्यागत जाणवू लागते. या गुहेतल्या झऱ्याच्या पाण्याने असाध्य अजार बरे होतात. बेर्नादत्तने मृत्यूआधी पवित्र मेरीच्या दर्शनाची व सांगितलेल्या रहस्यांची नोंदवही आप्ताकडे देऊन ठेवली होती. या वहीचा १४० वर्षांनी अभ्यास करून तिसरे रहस्य उघड करण्यात येते. ते म्हणजे १४ ते २२ ऑगस्टच्या दरम्यान पुन्हा लूर्द येथे अवतीर्ण होऊन आणखी एका व्यक्तीला स्वत:ची ओळख पटवून देऊ आणि दु:खमुक्तीचा चमत्कार घडवून आणू म्हणूनच जगातील सर्व वृत्तपत्रे अशा बातमीने झळाळतात की, ‘पवित्र व्हर्जिन मेरी लूर्द येथे पुन्हा अवतरणार व रुग्णांना दु:खातून मुक्त करणार.’ या बातमीने भले-भले प्रभावित होतात. ज्यात धनाढ्य केप क्लेटन, पंतप्रधान स्क्रायबिन, तरुण अभिनेत्री नताली, एडिथ मूर ही नोकदार अशा अनेकांचा समावेश असतो. म्हणूनच १४ ते २२ ऑगस्ट या काळात ३० लाख खासगी मोटारी, ३० हजार बसगाड्या, ४ हजार विमान व ११०० रेल्वेगाड्या लूर्दमध्ये प्रवाशांना आणून सोडणार होत्या. हा खरोखरच काही चमत्कार आहे की भाकडकथा आहे हे अजमावयला एपीआयची प्रतिनिधी लिझ फिच लूर्दला येते. यातले वास्तव म्हणजे नतालीला खरोखरीच दृष्टी येते, एडिथ कर्करोगमुक्त होतो. चमत्काराचे नवे अर्थ गवसत जातात. अखेर लूर्दची आर्थिक सुबत्ता येथीहल गुहेच्या पर्यटकांवर अवलंबून असते. म्हणूनच तेथे घडणाऱ्या चमत्कारांच्या कहाण्या सातत्याने लोकांपुढे येण्याची गरज असते. कथानकात असलेले गुंतागुंतीचे संदर्भ हे मुळातूनच वाचण्यासारखे. ‘द मिरॅकल’ वाचून विसाव्या शतकाच्या अखेरीस मराठी वाचक आपले विचार, आपला धर्म व आपलं राष्ट्र याबाबत परत एकदा अंतर्मुख होऊन पुन्हा नव्यानं मांडणी होईल या अपेक्षेनेच लेखकाने हा प्रपंच साधला आहे. कथानकाला साजेशी अशीच प्रवाही भाषा आहे. कादंबरीत बरेच फ्रेंच शब्दही आले आहेत. कादंबरीचा व्याप आणि पसारा बराच मोठा असूनही प्रवाही व बोलकी भाषा हे वैशिष्ट्यअसल्याने शेवटपर्यंत ती वाचावीशी वाटत राहते. कादंबरीत व्यक्त झालेला चमत्कार, श्रद्धा-अंधश्रद्धा यांच्या झुल्यावर झुलणारी नियतीशरण व्यक्तिमत्त्व व पवित्र व्हर्जिन मेरी यांचं सुखद दर्शन घडवणारे चंद्रमोहन कुलकर्णी यांचे मुखपृष्ठ अतिशय समर्पक व बोलके आहे.

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
समुदायाने जोडले
बंद