मुखपृष्ठ
द ओडेसा फाइल

माझे शेल्फ

द ओडेसा फाइल

इंग्रजी शीर्षक
The Odessa File
सारांश

जर्मनीतील माजी एस.एस. सभासदांची संघटना आहे . त्या संघटनेचे संक्षिप्त नाव ओडेसा. जर्मनी दुसरे महायुद्ध हरल्यावर बहुतेक एस.एस.अधिकाऱ्यांनी आपली ओळख लपवून जगभरातील विविध देशांमध्ये आश्रय घेतला आणि एकमेकांच्या संपर्कात राहू लागले . आपल्या लोकांचे रक्षण कणे ..जर्मनीला पुन्हा बलवान बनवायचे ..इस्त्रायलाजगाच्या नकाशावरून नष्ट करायचे हे त्यांचे उद्दिष्ट होते. अतिशय गुप्तपणे ओडेसाचे कार्य चालू होते .पण 22 नोव्हेंबर1963 ला राष्ट्राध्यक्ष केनेडीची हत्या झाली आणि त्याच दिवशी हॅम्बुर्गला एक वृद्ध इसमाने आत्महत्या केली . फ्री पत्रकार असलेल्या पीटर मिलरने सहजच त्या व्यक्तीची चौकशी केली आणि त्याच्या हाती लागली त्या व्यक्तीची डायरी . आत्महत्या केलेली व्यक्ती ज्यू होती आणि ती हिटलरच्या छळछावणीतून सुटून आलेली होती . डायरीत होती त्याच्या क्रूर छळाची हालअपेष्टाची कहाणी .पण त्यातही एक रहस्य होते .80000 ज्यूच्याहत्याकांडाला कारणीभूत असलेला एस एस अधिकारी एडवर्ड रोशमन अजूनही जिवंत आहे असे त्यात नमूद केले होते . ह्या एडवर्डला जगापुढे आणून त्याला शिक्षा व्हावी अशी त्या ज्यूची इच्छा होती . एक मोठी स्टोरी मिळेल या आशेने मिलर त्या घटनेचा माग घेण्याचे ठरवतो आणि चालू होतो एका क्रूरकर्म्याचा जीवघेणा पाठलाग.रोशमनला शोधण्यासाठी मिलरला कोणत्या दिव्यातून जावं लागतं, याची कहाणी ‘द ओडेसा फाईल’ या कादंबरीतून चित्रित केली आहे. मिलरचा या शोध मोहिमेच्या दरम्यानचा प्रवास चित्तथरारक आणि उत्कंठावर्धक आहे. तो प्रवास वाचकाला खिळवून ठेवतो. तो अनुभवण्यासाठी हे पुस्तक अवश्य वाचलं पाहिजे.

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
समुदायाने जोडले
बंद