माझे शेल्फ
द पेशंट
द पेशंट’ हे पुस्तक असे एका रुग्णाच्या माध्यमातून ऑस्ट्रेलियाच्या आरोग्यव्यवस्थेचा प्रवास घडवून आणणारे आहे. डॉ. मोहम्मद खाद्रा या सिडनी येथील सर्जरीच्या प्राध्यापकांनी लिहिलेले हे पुस्तक थेट फर्स्ट हॅण्ड अनुभव कथन म्हणावे असेच आहे. ऑस्ट्रेलियातील एका सार्वजनिक रुग्णालयात लघवीच्या तक्रारीसाठी तपासणीसाठी आलेला रुग्ण, त्याच्या आजाराचे निदान, त्यावरील शस्त्रक्रिया हे सारं मांडताना त्या देशातील एकूणच रुग्णव्यवस्थेचा लेखाजोखा उभा राहतो. डॉ. खाद्रा यांची लेखनशैली उत्तम तर आहेच, पण अनेक घटनांची मांडणी या एका रुग्णाभोवती करत त्यांनी सत्यकथा चांगलीच चित्तरकथा केली आहे.सत्तेचाळीस वर्षांच्या जोनाथन ब्य्रूस्टरला जग मुठीत आल्यासारखं वाटतं. त्याच्याजवळ काय नाही? लठ्ठ पगाराची नोकरी, सुखी संसार, खासगी शाळेत जाणा-या दोन मुली, झकास बंगला आणि आलिशान गाडी! त्याच्यावर कर्जाचा बोजाही आहे; पण त्याची त्याला काळजी नाही. मात्र, एका पहाटे त्याला लघवीवाटे रक्त जातं. रुग्णालयाच्या इमर्जन्सी विभागात डॉक्टरांच्या भेटीसाठी आठ तास थांबावं लागतं. ह्या यशस्वी आयुष्यात जोनाथनचं आरोग्याकडे दुर्लक्ष झालंय. युरॉलॉजिस्ट मोहम्मद खाद्रा त्याच्या संपर्कात येतात. निदान आणि उपचार ह्यांच्या भूलभुलैयात त्याला मूत्राशयाचा कॅन्सर असल्याचं निष्पन्न होतं; पण डॉ. खाद्रांच्या दृष्टीनं जोनाथन आजाराच्या मानानं तरुण असला, तरी एक सामाान्य रुग्ण राहत नाही. त्यांच्या आयुष्यातली साम्यस्थळं दिसू लागतात. डॉ. खाद्रांचं आयुष्यही एका ठरावीक वळणावर जातं. आयुष्य नश्वर आणि बेभरवशाचं असल्याचं त्यांचा आजार त्यांना शिकवून जातो.डॉ. खाद्रा यांची लेखनशैली उत्तम तर आहेच, पण अनेक घटनांची मांडणी या एका रुग्णाभोवती करत त्यांनी सत्यकथा चांगलीच चित्तरकथा केली आहे. मुळात ते स्वत:च डॉक्टर असल्यामुळे साऱ्या खाचाखोचा अगदी तपशीलवार पण रटाळ न होऊ देता येतात आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या स्वत:च्या आयुष्यातील अनेक बदलांशी त्या जोडल्या जातात. गोपनीयतेचा नियम जपण्यासाठी नावात केलेला बदल सोडल्यास ते काहीच लपवत नाहीत. अगदी स्वत:चा कर्करोग देखील. त्यामुळेच हे पुस्तक म्हणजे केवळ एक सनसनाटी न राहता अंतर्मुख करणारे लेखन म्हणून वाचावे असेच आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या पुस्तकाचा अनुवाद हा देखील एका डॉक्टरांनी केला असल्यामुळे तो मूळ लिखाणाइतकाच प्रभावी झाला आहे.