मुखपृष्ठ
द फेसबुक इफेक्ट

माझे शेल्फ

द फेसबुक इफेक्ट

इंग्रजी शीर्षक
The Facebook Effect
सारांश

फेसबुक’ हे नाव आजमितीला घराघरांत पोहोचले आहे. आजच्या पिढीत तर फेसबुक वापरत नसेल असा माणूस सापडणे विरळ आहे. संपूर्ण जगाला अल्पावधीत वेड लावणाऱ्या या फेसबुकचा रंजक आहे. छोट्या कॉलेजपासून सुरू झालेल्या ‘फेसबुक’चा शोध नेमका कसा लागला? याची वाढ कशी झाली?फेसबुकच जडणघडण, फेसबुकचे भविष्य अशा अनेक प्रश्नांवर या पुस्तकात प्रकाश टाकण्यात आला आहे.हॉवर्ड मध्ये एका एकोणीस वर्षांच्या विद्यार्थ्यांनी एका कंपनीची निर्मिती केली या कंपनीने केवळ इंटरनेट जगतामध्ये बदल घडून आले नाहीत तर मार्गही बदलले . या पुस्तकात लेखकाने फेसबुक कसे तयार झाले, त्याची वाढ कशी झाली, आणि त्यांचे भविष्य काय असेल याची तपशीलार माहिती संशोधन करून मांडली आहे . यात फेसबुक वाढीच्या प्रवासात त्याला आलेले यश- अपयश झालेल्या चुका यांच्यावरही प्रकाश टाकण्यात आला आहे. मुख्य म्हणजे हे पुस्तक स्वतः मार्क झुकेरबर्ग आणि फेसबुकच्या जडणघडणीत महत्त्वाचे योगदान देणाऱ्या व्यक्तींच्या मुलाखतीवर आधारलेले आहे . हे पुस्तक आहे त्या व्यक्तीबद्दल ज्या व्यक्तीने जगभरातील करोडो लोकांना अक्षरश: वेड लावले . क्वचितच असा एखादा व्यक्ती सापडेल की ज्यांनी कधीच फेसबुकचा उपयोग केला नाही ,फेसबुकने संपूर्ण जगावर दुरगामी परिणाम केलेले आहेत . २०११ साली इजिप्त टय़ुनिशिया सारख्या अनेक देशात जनक्रांती झाली, हुकूमशाही जाऊन लोकशाहीचा उदय झाला या मागची प्रेरणा फेसबुकच होते हे नंतर उघड झाले. म्हणजेच आज सामजिक माध्यमं सगळया जगाला बदलुन टाकण्याची एखादया देशात सत्तापलट करण्याची ताकद ठेवते. सर्वं सामाजिक माध्यमात फेसबुक हे एक शक्तीशाली माध्यम आहे. त्याच्या जन्मापासुनचा प्रवास या पुस्तकात दिला आहे.

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
समुदायाने जोडले
बंद