मुखपृष्ठ
द फकीर

माझे शेल्फ

द फकीर

इंग्रजी शीर्षक
The Fakir
सारांश

आत्महत्येकडे कल असलेला एक हिप्पी आणि अजब विनोदबुद्धी असलेला एक फकीर, असा प्रवास जो तुमचं आयुष्य कायमचं बदलू शकेल.... जिथं देव आणि गुरू वास करतात, त्या तुमच्या अंतर्मनाला अर्पण केलेला, ‘फकीर’ हा श्वास रोखायला लावणारा, आत्म्याच्या साहसी मुशाफिरीचं रेखाटन करणारा ‘अक्षर’ नजराणा आहे. जिवंत असण्याचा आनंद अनुभवा, सोपं पण आयुष्य बदलून टाकणारं, सर्वांबद्दल दयाभाव राखण्याचं तत्त्वज्ञान शिका आणि बदलाकडचं पहिलं पाऊल उचलून स्वत:ला बरं करा. ही आहे एक चित्तवेधक कहाणी. कर्म, दैवी कृती, मृत्यूनंतरचं आयुष्य, आत्म्याचा आत्म्याशी संपर्कं, प्रार्थनेतली शक्ती, श्रद्धा आणि क्षमा, ऊर्जा आणि बरं करणं, चांगुलपणात देवाचा शोध घेणं आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे सतत गुरूशी सुसंवाद साधून राहाणं, यासारखे गहन प्रश्न, ती सोप्या, समजेल, उमजेल अशा पद्धतीनं हाताळते. ‘द फकीर’ फक्त तुम्हाला कसं जगायचं एवढंच शिकवत नाही... पण मरण कसं स्वीकारायचं तेही शिकवतं.फकीराचं जगणं पाहताना आणि त्याचे विचार ऐकताना हिप्पी तरुणाचं जीवनच पार बदलून जातं. त्या बदललेल्या जीवनाचा साहित्यिक प्रवास या कादंबरीत तंतोतंत आणि आकर्षक पद्धतीनं रेखाटलेला आहे. पूर्वसंचित, कर्म, दैव, प्रार्थना, दया, पूजा, क्षमा, शांती, मरणोत्तर जीवन इत्यादी अनेक गहन प्रश्नांचा वेध इथं लेखकानं अत्यंत सहज सोप्या भाषेत आणि कथानकाच्या ओघात लीलया घेतलाय. जगावं कसं आणि मरावं कसं याचे पाठही कादंबरी प्रभावीपणानं देते. सुनीति काणे यांनी मराठी अनुवाद करताना मूळ कथानकाचा आत्मा जाणून घेऊन न्याय दिलाय.

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
समुदायाने जोडले
बंद