मुखपृष्ठ
द सेव्हन्थ सीक्रेट

माझे शेल्फ

द सेव्हन्थ सीक्रेट

इंग्रजी शीर्षक
The Seventh Secret
सारांश

हिटलरच्या डेंटिस्ट कडून मिळालेली, त्याच्या दातांचा सोन्याचा ब्रिज आणि गळ्यातील लॉकेट चा धागा पकडून हिटलर च्या सातव्या बंकर पर्यंत पोहचण्याची थरारक कथा. वडील मिस्टर अशक्रॉफ्ट ह्यांच्या हत्येनंतरही चिकाटीने, जिद्दीने एमिली अशक्रॉफ्ट नी हिटलर च्या बंकरचा लावलेला शोध, त्या साठी घेतलेली मेहनत, आव्हानं आणि तिला इतर एजंट्स नि केलेली मदत. ह्या सगळ्यांचा योग्य मिलाफ म्हणजे हे पुस्तक. एक-एक धागा पकडून त्याचा संबंधित धागा ओळखणं, शोधणं, पकडणं हे एव्हढ छान मांडलंय की हे पुस्तक वाचकाला खिळवून ठेवते. हिटलरच्या भूमिगत साम्राज्यात नेणारी जबरदस्त रहस्यमय कादंबरी ! आयर्विंग वॅलेस यांची प्रचंड लोकप्रिय ठरलेली, उत्कृष्ट अनुवाद म्हणून नावाजली गेलेली कादंबरी. साहित्य अकादमी च्या हुज हू या सूचित उल्लेख केले गेलेले तसेच, रॉबिन कूक, सिडने शेल्डन, जेम्स हेडली ह्यांसारख्या बेस्ट सेलर लेखकांच्या कादंबऱ्यांचा अनुवाद केलेले विजय देवधर ह्यांनी अगदी उत्तम प्रकारे ही कादंबरी वाचकांसमोर मांडली आहे.

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
समुदायाने जोडले
बंद