मुखपृष्ठ
द सिंपल ट्रूथ

माझे शेल्फ

द सिंपल ट्रूथ

इंग्रजी शीर्षक
The Simple Truth
सारांश

द सिम्पल ट्रूथ मूळ लेखक David Bowlda , मराठी अनुवाद , सुधाकर लवाटे.प्रकाशन मेहता पब्लिशिंग Fort Jackson या मिलिटरीच्या तुरुंगात रूफस हार्म्स `हा कैदी एका लहान मुलीची हत्या केल्याच्या आरोपावरून, पंचवीस वर्षांपासून आजन्म कारावासाची शिक्षा भोगत असो.यामध्ये त्याची स्मरणशक्ती गमावलेली,त्याला फक्त मुलीच्या हत्येच्या प्रसंगाची आठवण होती.एक दिवस अचानक त्याच्या पर्यंत एक पत्र पोहोचते.जे मिलिटरी कडून आलेले असतेआणि हे पत्र कथेला वळण, रूफसच्या स्मृतीला आठवणींचा उजाळा देते.आणि त्याला फक्त तो हत्येचा प्रसंग आठवत असतो, आता मात्र,त्या घटनेविषयी सगळंच आठवते. यानंतर रूफस स्वत: त्याच्या वकीलामार्फत सुप्रीम कोर्टात न्याय मिळावा म्हणून याचिका दाखल करतो, मात्र ती याचिका सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचतच नाही,व त्याच्या वकीलाचा व त्याच्या पत्नीचा खून होतो.हे याचिकेचा अर्ज व पत्र पाहणार्या सुप्रीम कोर्टाचा क्लार्क मायकेल फिस्क याचा सुद्धा खून होतो. आपल्या भावाचा खून कोणी केला,याचा शोध मायकेल फिस्कचा भाऊ जॉन फिस्क आणि मायकेल ची सहकारी,सारा इव्हान्स सुरू करतात. त्या पत्रात काय असते? विशेष म्हणजे रूफसने न्याय मिळावा म्हणून केलेली याचिका सुप्रीम कोर्टात पोहचलेली नसते.मग त्यावर निर्णय कसा होणार?सत्य उजेडात आलच पाहिजे.कितीही दडवण्याचा प्रयत्न केला, तरी शेवटी जे बाहेर येत ते निखळ सत्य असतं, असे त्यांचे मत . शेवटपर्यंत खर काय याची उत्कंठा टिकवून ठेवते.

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
समुदायाने जोडले
बंद