मुखपृष्ठ
द सटन बग

माझे शेल्फ

द सटन बग

इंग्रजी शीर्षक
The Satan Bug
सारांश

द सटन बग" या अ्ॅलिस्टर मॅक्लीन लिखित मूळ इंग्रजी पुस्तकाचा, अशोक पाध्ये यांनी केलेला मराठी अनुवाद. (वाचायला साडे सहा तास लागले, 4 टप्प्यात वाचली .) ... प्रतिबंधक लसी, औषधे तयार करण्याच्या नावाखाली प्रत्यक्षात जैविक अस्त्रे बनवणारी, अत्यंत कडेकोट सरक्षा असलेली सरकारी प्रयोग शाळा. तिकडे अवघ्या अर्ध्या तासात अख्खे शहर बेचिराख करील असा एक विषाणू बनवला जातो. दोन शास्त्रज्ञांचे निर्घृण खून करून ते विषाणू असलेल्या कुप्या पळवल्या जातात. या सगळ्यामागे त्या प्रयोगशाळेतच काम करत असलेल्या एका बुद्धिमान गुन्हेगाराचे डोके असते. हा गुन्हेगाराने तोतयाचे रूप घेवून प्रयोगशाळेत शिरकाव केलेला असतो. आपल्या सहकाऱ्यांना ब्लॅक मेल करून विषाणू कूप्या पळवण्यात तो यशस्वी झालेला असतो. तपास यंत्रणांना बुचकळ्यात पाडण्यासाठी व अधिक वेळ मिळावा म्हणून प्रयोगशाळेतल्या इतर सहकार्यावर संशय जावा अशी चोख व्यवस्था त्याने केलेली असते. पण दुर्दैव अर्पण सुदैवाने त्याची गाठ अत्यंत चलाख अशा नायकाशी पडते. नायक हुशारीने एकेक कोडे सोडवत जातो व शेवटी खलनायका पर्यंत पोचतो. या टप्प्यावर खलनायक हिरोच्या बायकोचे अपहरण करतो ! शहरातल्या सर्व बँकांवर डल्ला मारून एखाद्या अज्ञात ठिकाणी निघून जायचा त्याचा डाव असतो. जर त्याला अडवायचा प्रयत्न झाला तर आपल्याकडील विषाणूंच्या कुप्या फोडून परिसरातली सगळी जीव सृष्टी तो नष्ट करणार असतो ! त्याने स्वतःचा त्या विषाणू पासून बचाव व्हावा म्हणून लस टोचून घेतलेली असते . त्या मूळे तो सेफ असतो ! हीरो आपली बायको वाचवू शकतो का ? विषाणू असलेल्या कुप्या ताब्यात घेवु शकतो का ? खलनायकाचा हेतू साध्य होतो का ? शहराचा विनाश टळतो का ? या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळण्यासाठी ही कादंबरी वाचायलाच हवी ! वाचणाऱ्याला खिळवून ठेवण्याची ताकद या कादंबरीत आहे ! अशोक पाध्ये यांनी अनुवाद सुद्धा अगदी ओघवता केला आहे.

पुस्तकाची माहिती

पृष्ठसंख्या
304
भाषा
मराठी
किंमत
280.00
समुदायाने जोडले
बंद