मुखपृष्ठ
द व्हॉल्ट ऑफ विष्णू

माझे शेल्फ

द व्हॉल्ट ऑफ विष्णू

इंग्रजी शीर्षक
The Vault Of Vishnu
सारांश

अश्विन सांघी यांनी लिहिलेली दि व्हॉल्ट ऑफ विष्णू ही #कादंबरी म्हणजे एक प्राचीन आणि सद्य परिस्थितीशी मेळ घालणारी थरारक #रहस्य कादंबरी आहे. दीड हजार वर्षांपूर्वी चिनी प्रवासी ह्यूएन त्संग याने भारताला भेट दिली होती. त्याच्या प्रवासाचे चित्रण व त्याला अनुसरणाऱ्या सद्यपरिस्थितीचे कथानक असा मेळ घालणारी ही कादंबरी आहे. #भारत आणि #चीन या २१ व्या शतकामध्ये वेगाने विकसित होणाऱ्या अर्थव्यवस्था आहेत. शिवाय दोघेही सख्खे शेजारी असल्यामुळे स्पर्धा देखील प्रत्येक पातळीवर आपल्याला पाहायला मिळते. चार वर्षांपूर्वी चीनने भारताच्या डोकलाम येथे भारतीय हद्दीमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला होता. यावर बराच गदारोळ देखील उठला. याच पार्श्वभूमीचा वापर करून लेखकाने भारत आणि चीन प्राचीन संबंधांपासून आज असलेल्या संबंधांपर्यंतचा लेखाजोखा या रहस्य कादंबरीमधून मांडलेला आहे. ह्यूएन त्संगचा प्रवास आणि आजच्या भारत व चीन मधील घडामोडी हे दोन्ही प्रसंग समांतर पद्धतीने या पुस्तकात रेखाटण्यात आलेले आहेत. ह्यूएन त्संगचा प्रवास हा अतिशय रोमांचकारी, अवघड आणि विविध साहसं व नशिबाने भरलेला जाणवतो. आपल्या लेखणीने लेखक आपल्याला दीड हजार वर्षांपूर्वीच्या काळात घेऊन जातो. विशेष म्हणजे या प्रवास वर्णनात वापरलेली स्थळांची सर्व नावे तत्कालीन आहेत. यातूनच प्राचीन भारतातील बौद्ध संस्कृतीची घट्ट पकड देखील आपल्याला ध्यानात येते. तत्कालीन बौद्धमय भारत कसा होता, हे देखील अनुभवयास मिळते. सुरुवातीलाच या चिनी प्रवाशाच्या प्रवासाचा संपूर्ण मार्ग स्थळांसहित नकाशामध्ये दाखविण्यात आलेला आहे. कदाचित तो नकाशा नसता तर कादंबरीतील वर्णन सुरस वाटले नसते. काही वर्षांपूर्वी तमिळ भाषेमध्ये अभिनेत एल्लम अरीवू (हिंदी भाषांतरित-चेन्नई टु चायना) हा चित्रपट बनविला होता. बोधिधर्म या बौद्ध भिक्खूच्या चीन प्रवासावर आधारित या चित्रपटाचे कथानक होते. याच बोधिधर्मचा प्रवास व कर्तुत्व देखील कादंबरीमध्ये वाचायला मिळते. यात अनेक पात्रे आहेत, शेकडो घटना आहेत. परंतु त्यांचा मेळ अतिशय उत्तमरीत्या लेखकाने बसविल्याचा दिसतो. अतिशय शांतपणे व एकाग्र चित्ताने ती वाचल्यास त्याचे थरारकनाट्य व रहस्यभेद हे वाचनाची खरीखुरी अनुभूती देतात. तीन-चार ठिकाणी झालेले रहस्यभेद हे अनपेक्षित वाटून जातात, यातच लेखकाचे यश सामावलेले आहे!

आता पूर्वीपेक्षा जास्त माहिती व पैसा उपलब्ध असल्याने नेट कोरुंबाहून पेंटॅनलला आपले ब्राझीलमधील जुने सहकारी व एक अद्ययावत विमान घेऊन जातो. तेथे गेल्यावर गावकरी, गावचा मुखिया यांच्याद्वारे त्यांचे अत्यंत थंडपणाने स्वागत होते किंवा जवळजवळ येथे का आलात? अशीच त्यांची प्रतिक्रिया असते. नेट भांबावतो. पण चौकशीअंती रॅचेल काही काळापूर्वी मृत्यू पावल्याचे त्याला समजते. मुखिया तिच्या झोपडीजवळ नेटला नेतो. तेथे नेटला काही कागद मिळतात. त्यापैकी एक रॅचेलचे कायदेशीर मृत्युपत्र असते. मृत्युपत्राद्वारे ती मिळणारी संपत्ती नाकारत नाही. तर त्याचा एक ट्रस्ट बनवून मिळणारे उत्पन्न जगात आदिवासी कल्याण संघाचे काम चालू ठेवणे, खिस्ताच्या शिकवणुकीचा जगभर प्रसार करणे, आदिवासींच्या अधिकारांची जपणूक, भुकेलेल्यांना अन्न, रुग्णांना औषधे, लहान मुलांचे योग्य पोषण यासाठी वापरावी, ट्रस्टचा प्रमुख म्हणून नेट ओ रॉयले यांना नेमावे अशी इच्छा व्यक्त करते. अनुवाद फार सुरेख जमला आहे. भाषा प्रवाही व सोपी आहे. पण आशयाला कोठेही धक्का लागलेला नाही. जरूर वाचावी अशी कादंबरी.

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
समुदायाने जोडले
बंद