माझे शेल्फ
डाय फॉर मी
फिलाडेल्फियाच्या आपल्या बर्फाच्छादित निर्जन शेतात हार्लन विंचेस्टर बायकोने गिफ्ट दिलेला धातूंशोधक यंत्र घेऊन बाहेर पडतो आणि त्याला एक मृतदेह सापडतो .त्या शेतात अजूनही काही मृतदेह असतील असे डिटेक्टिव्ह व्हीटो याला जाणवते .वैद्यकीय परीक्षक कॅथरिन त्याला सोफी जोहान्सन या पुरातत्त्व संशोधकाची मदत या कामात घेण्याचं सुचवते. सोफी आपल्या जी. पी. आर.च्या साहाय्यानं तिथे शोध घेऊ लागते, तेव्हा एक-दोन नाही, तर कितीतरी प्रेतं तिला स्क्रीनवर दिसतात आणि शिवाय अनेक रिकामे खड्डे! ... तो अनेक नावांनी वावरतो. तो ओ-आर-ओ या कंपनीसाठी काम करतो आणि ती कंपनी व्हिडिओ गेम्स तयार करते. फ्रेझिअर लुईला मध्ययुगीन काळातल्याप्रमाणे यातना देणाऱ्या साधनांचा उपयोग चित्रिकरणासाठी करायचा असतो आणि त्यासाठी त्याला सोफी हवी असते!क्रौर्याची परिसीमा गाठणारी आणि चक्रावून टाकणारी एक रहस्यकथा.