मुखपृष्ठ
दडलेला इतिहास

माझे शेल्फ

दडलेला इतिहास

इंग्रजी शीर्षक
Dadlela Itihas
सारांश

दडलेला इतिहास’ (HIDDEN HISTORY) हे पुस्तक पहिल्या महायुद्धास जबाबदार असणाऱ्या लोकांना वैशिष्ट्यपूर्ण रीतीने उजेडात आणते. लंडनमधील धनाढ्य आणि प्रभावशाली अशा व्यक्तींनी अगदी गुप्तपणे एक कंपू करून हेतुत: सिक्रेट सोसायटीची स्थापना केली व त्याद्वारेच मानवेविरुद्ध घडवून आणलेला अतिशय क्रूर पाशवी गुन्हा म्हणजे पहिले महायुद्ध. जगापासून आपली गुन्हेगारी लपवून ठेवण्यासाठी या लोकांनी जाणूनबुजून युद्धाच्या उगमांची खोटी व दिशाभूल करणारी कारणे कशी तयार केली व ती खोट्या इतिहासाद्वारे जगासमोर कशी मांडली हे या पुस्तकाने उघड करून दाखविले आहे. (हाच खोटा इतिहास गेल्या शतकभर शाळा-कॉलेजांतून व विद्यापीठांतून शिकविला जातो आहे.) या पुस्तकातून एक खेचून घेणारे आव्हान उभे केले आहे व लेखकद्वयाचे एवढेच सांगणे आहे की, त्यांनी तुमच्यासमोर मांडलेल्या पुराव्यातले सत्य वाचकांनी पडताळून पाहावे.पहिल्या युद्धाच्या दडवलेल्या पाऊलखुणा... जेरी डॉशेर्टी आणि जिम मॅकग्रेगर लिखित हिडन हिस्ट्री या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद स्नेहलता जोशी यांनी ‘दडलेला इतिहास’ या नावाने केला आहे. पहिल्या महायुद्धाचा इतिहास हे एक जाणूनबुजून रचलेले असत्य आहे.अर्थात त्यातले बलिदान, शौर्य, अकारण झालेली महाभयंकर जीवितहानी व त्यापाठोपाठ झालेली दुर्दशा हे असत्य नाही. गरज नसताना मुद्दाम १९१५च्या पुढेपर्यंत कसे सुरू ठेवले. या गोष्टी मात्र शतकभर कशा यशस्वीपणे लपवून ठेवल्या. युद्धासाठी जर्मनी नव्हे, तर ब्रिटनच कसा जबाबदार होता, ही वस्तुस्थिती दडविण्यासाठी अतिशय काळजीपूर्वक मिथ्या इतिहास रचला गेला. अगदी सफाईदारपणे मांडणी करत हे पुस्तक मनात पहिल्या युद्धाविषयी एक अनाकलनीय शंका उपस्थित केल्यावाचून राहत नाही.

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
समुदायाने जोडले
बंद