माझे शेल्फ
डिनायल : अ मेम्वार ऑफ टेरर
या पुस्तकाची लेखिका आहे जेसिका स्टर्न, नावाप्रमाणेच अतिशय करारी स्त्री. जेसिका हॉवर्ड विद्यापीठात दहशतवाद या विषयाची व्याख्याती आहे.दहशतवाद्यांना भेटून, त्यांच्या मुलाखती घेऊन तिने टेरर इन द नेम ऑफ गॉड आणि द अल्टिमेट टेररिस्ट ही दोन पुस्तकं लिहिली आहेत. जे आपल्या अभिनव कल्पनांनी जग बदलतील अशा सात विचारवंतांपैकी एक म्हणून टाइम मॅगेझिनने तिची निवड केली होती. ती आणि तिची धाकटी बहीण सारा या दोघींवर एका अनोळखी माणसाने पिस्तुलाचा धाक दाखवून बलात्कार केला होता. डिनायल हे जेसिकाच्या स्वानुभवावर आधारित आत्मवृत्त आहे. बलात्कारापूर्वीचं तिचं आयुष्य, बलात्कार होतानाचं आणि बलात्कारानंतरच्या तिच्या मानसिकतेचं तपशीलवार वर्णन जेसिका करते. बलात्कारापेक्षाही तिला जास्त धक्का बसतो तो पोलीस, समाज, नातेवाईक, यांच्या वागणुकीमुळे. पोलीस घटनेचा पुरता तपास करत नाहीत, जेसिकाच्या बोलण्यावर विश्वास ठेवत नाहीत. परिणामी तो बलात्कारी नंतरच्या तीन वर्षांच्या काळात आणखी ४४ मुलींवार बलात्कार करतो. अस्वस्थेबरोबरच गंभीरपणे विचार करायला लावणाऱ्या या पुस्तकाचा अनुवाद मैत्रेयी जोशी यांनी केला आहे. फरारी असं म्हणणारी जेसिकास्टर्न,आंतरराष्ट्रीयख्याती ची दहशतवादतज्ज्ञ आणि विरोधाभास असाकी, हीच दहशत तिला स्वत:ला अगदी कोवळ्यावयात अनुभवावी लागली – गनपॉइंटवर केलेल्या बलात्काराच्या रूपानं! तीनहून अधिकत पंयादहशती ची वेदना ती नाकारत राहिली; एका कर्तव्यदक्ष पोलीस ऑफिसरनं तिची केस पुन्हा हातात घेईपर्यंत. एकीकडे झ्ऊएची लक्षणं (आघातोत्तरतणावविकृती) तर दुसरीकडं कर्तृत्वाची उंच भरारी; अशा दोन पातळ्यां वर तिचं जीवनपुढं जात राहिलं. पण तिच्यातल्या संशोधकानं आपल्या बलात्का-याचा अभ्यास करण्याची चालून आलेली ही संधी वाया नाही घालवली. आपला गुन्हेगार ब्रायनबीट,याच्या मित्रपरिवाराच्या तिनं मुलाखती घेतल्या.ब्रायनबीट जिथं राहत होता ते घर ती बघून आली. इतकच नाहीतर स्वत:चं कुटुंब,स्वत:चं मन यांचं परिशीलन तिनं केलं आणि त्यातून साकारलं हे पुस्तक... एका धाडसी विषया इतकाच मनमोकळा आढावाघेणारं हे पुस्तक मनाच्या अथांग डोहात डोकावण्याची जिज्ञासा असणा-या प्रत्येक वाचकासाठी! पण, लेखिका तेवढ्यावरच थांबत नाही. जाता-जाता ती सावधतेचा इशाराही देते. बलात्कारा सारख्या अत्यंत घृणास्पद गुन्ह्याला समाज पटकन विसरून जातो; त्या गुन्ह्याच्या गांभीर्याचा अस्वीकार करतो आणि त्याचे परिणाम त्या समाजाला तसेच पुढच्या पिढ्यांनाही भोगावे लागतात.