मुखपृष्ठ
डॉग बॉय

माझे शेल्फ

डॉग बॉय

इंग्रजी शीर्षक
Dog Boy
सारांश

गोर्बाचेव्हनंतरच्या काळात रशियात बेसुमार लोकसंख्यावाढ झाली. या वाढीमुळे उपासमार, गरिबी असे अनेक भीषण प्रश्न निर्माण झाले. या गंभीर समस्यांमुळे रशियातील लाखो मुले बेघर झाली. अन्न, वस्त्र तर नाहीच पण त्यांना राहण्यास निवारा मिळणेही अशक्य होऊ लागले. पर्ायाने अशी बेवारस मुले रस्त्यांवर निवारा शोधू लागली, पण अशा बेवारस मुलांचा सांभाळ केला तो तिथल्या रानटी कुत्र्यांनी. अशी आगळीवेगळी कथा मांडली आहे ‘डॉग बॉय’ या पुस्तकात. रोमोचका या एका डॉग बॉयची कथा या कादंबरीत आहे. कुत्र्यांवर प्रेम असलेल्यांसाठी ही कादंबरी म्हणजे पर्वणीच आहे. कादंबरी वाचतानाच कुत्र्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. भूतदया वर्षानुवर्षे चघळला जाणारा विषय आहे. ‘डॉग बॉय’ या कादंबरीतल्या रोमांचक कथेच्या माध्यमातून या विषयाकडे बघण्याची नवी दृष्टी मिळते. प्राणिजगताबद्दल आढळून येणारी आस्था या कादंबरीत प्रतिबिंबित होते. आजच्या युगात माणसामाणसांतील नात्यांविषयी खात्री देता येत नाही, पण प्राणी आणि माणूस यांच्यातील नाजूक धागा कादंबरीतून प्रकाशित होतो. पुढे काय होईल याबाबतची उत्सुकता टिकून राहते. मनावर खोलवर परिणाम करणारे, खिळवून ठेवणारे वास्तववादी चित्रण करणारी असे या कादंबरीचे वर्णन करता येईल. रोमोचकाचा मनुष्यत्वाकडून पशुत्वाकडे आणि पुन्हा पशुत्वाकडून मनुष्यत्वाकडे झालेल्या प्रवासाची मांडणी प्रभावी झाली आहे. चित्तथरारक अशी ही कादंबरी वाचकांना नक्कीच खिळवून ठेवते.

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
समुदायाने जोडले
बंद