मुखपृष्ठ

माझे शेल्फ

डोंगरी ते दुबई

इंग्रजी शीर्षक
Dongri Te Dubai
सारांश

डोंगरी ते दुबई : मुंबईतील गुन्हेगारी जगतावरील महत्वाचे पुस्तक मुख्यत्वेकरून कुप्रसिद्ध गुन्हेगारी जगतातील " डॉन " समजल्या जाणाऱ्या दाऊद इब्राहिम (कासकर) ची गुन्हेगारी विश्वातील वाटचाल यात अधोरेखित केले आहे. यातून निर्माण झालेल्या टोळ्या व त्यां्यातील टोळीयुद्ध मोडीत काढण्यासाठी मुंबई के पोलिसांनी केलेले प्रयत्न व केलेली एन्काऊंटरस. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी म्हणून पूर्वीपासूनच प्रसिद्ध असून सर्वाधिक रोजगार देणार, स्वप्नपूर्ती करणारे शहर म्हणून नावाजलेलं होते व आजही आहे. या ठिकाणचा समुद्र किनारा, माझगाव डॉक येथील मोठे आयात बंदर व त्यामुळे संपूर्ण जगातून येथे होणारी आयात-निर्यात त्यातून मिळणारे मोठे उत्पन्न, गिरणी कारखान्याची निर्मिती यामुळे रोजगाराला मिळालेली चालना या कारणामुळे देशातील उत्तरे व दक्षिणेकडून कामाच्या शोधात आलेल्या कामगारांचा लोंढा. नंतर गिरणी कामगार संपामुळे वाढलेली तरुण बेरोजगारी. मुंबईतील उच्चभ्रू वर्ग त्यांचं अलिशान राहणीमान मुंबईतील झगमगाट याला मोहुन अनेक तरुण झटपट श्रीमंत होण्यासाठी गुन्हेगारी जगताकडे त्यांचं झालेलं स्थलांतर तस्करी, मटका,जुगार, दारूचे गुत्ते, लुटालूट, खंडणी, खून इत्यादी मार्गे मुंबईत सुर झालेली गुन्ह्यांची सुरुवात. यातून निर्माण झालेल्या गुंडांच्या टोळ्या, त्यानंतर ची रक्तरंजित टोळीयुद्ध, दाऊदची " डी " कंपनी अरुण गवळीची "BRA" कंपनी. दाऊद ची अंडरवर्ल्डमधील वाटचाल त्याला येऊन मिळालेले गुंड व त्यांच्या टोळ्या, इलेक्ट्रॉनिक वस्तू व सोन्याची त्याने केलेली तस्करी. नंतर दाऊदचे दुबई मध्ये झालेले पलायन, दाऊद या गुंड, तस्कराचे नंतर झालेले जागतिक हिटलिस्ट वरील दहशत वाद्यात रूपांतर. दाऊद चे बॉलीवूड व क्रिकेट जगताशी सोबत असलेले संबंध.यातून निर्माण झालेली दाऊदची प्रेमप्रकरणे इत्यादी. हुसेन झैदी यांचे लिखाण शैली ही वाचकाला खिळवून ठेवते. त्यांनी अनेक वर्ष क्राईम रिपोर्टर म्हणून विविध वृत्तपत्रात केलेलं काम. गुन्हेगारी जगतातील बारकावे यांचे त्यांनी केलेले वर्णन या पुस्तकाला एक उंचीवर नेऊन ठेवत. याच बरोबर. एक शहर म्हणून मुंबईची झालेली डेव्हलपमेंट, बांधकामे, तेथील निर्माण झालेली उपनगरे, रोजगार निर्मिती या निमित्ताने आलेले लोक व शहराची भरभराट याचा पूर्ण लेखाजोखा यातून मिळतो. अंडरवर्ल्ड ( छुपे जगत) ची वास्तविक प्रकारची माहिती, त्यांच्याशी असलेले राजकारणी, बॉलीवूड क्षेत्राचे, पोलिसी संबंध सामान्य वाचकाला नक्कीच हेलावून टाकते.

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2023
पृष्ठसंख्या
440
भाषा
मराठी
किंमत
495.00
ISBN
9788184984491
समुदायाने जोडले
बंद