मुखपृष्ठ
ड्रीम्स ऑफ जॉय

माझे शेल्फ

ड्रीम्स ऑफ जॉय

इंग्रजी शीर्षक
Dreams Of Joy
सारांश

जॉय ही एकोणीस वर्षांची मूळ चिनी वंशाची मुलगी अमेरिकेतून चीनमध्ये येते, झेड. जी. या तिच्या चित्रकार असलेल्या वडिलांना शोधण्यासाठी. झेड.जी. तिला भेटतात. ती त्यांच्याबरोबर एका खेड्यात जाते. तिथे ताओ नावाच्या शेतकरी मुलाशी लग्न करते. तिला मुलगी होते; पण खेड्यातील कष्टप्रद जीवन, तिच्या नवर्याचं आणि त्याच्या कुटुंबाचं स्त्रीद्वेष्टेपण तिला रुचत नाही. तिच्या खेड्यावर ओढवलेल्या उपासमारीच्या संकटात ती, तिचा नवरा आणि मुलगी मरणाच्या दारात जातात; पण तिला शोधत अमेरिकेहून चीनला आलेली तिची आई पर्ल आणि झेड.जी. त्यांना तिथून बाहेर काढतात आणि वाचवतात. आता या सगळ्यांना चीनमधून कायमचं निसटून हाँगकाँगला जायचं असतं; मात्र सरकारच्या जाचक धोरणांमुळे ते महाकर्मकठीण असतं. कसं पार पाडतात ते हे दिव्य? शेवटी ते हाँगकाँगला पोचतात की नाही? कम्युनिस्ट राजवटीच्या पाश्र्वभूमीवरील, स्थलांतरितांच्या आणि स्थानिकांच्याही गळचेपीचं, शोषणाचं विदारक चित्रण करणारी कादंबरी.

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
समुदायाने जोडले
बंद