मुखपृष्ठ
द्विदल

माझे शेल्फ

द्विदल

इंग्रजी शीर्षक
Dwidal
सारांश

नव्या युगाच्या विज्ञानकथा... पूर्वी हाताच्या बोटांचे ठसे, श्वानाने घेतलेला वास किंवा रक्ताचे रिपोर्ट्स यांचाच काय तो गुन्ह्याच्या शोधांमध्ये उपयोग होत होता. आता विज्ञान आणि तंत्रज्ञान यांची बरीच प्रगती झाली आहे आणि त्यातून उपलब्ध झालेल्या नवनवीन यंतरणांचा अधिकाधिक वापर गुन्ह्यांच्या तपासासाठी केला जातो. पोलिसांच्या तपासाला कुणा वैज्ञानिकाची जोड मिळाली तर तो तपास कसा चित्तथरारक होतो याची झलक डॉ. बाळ फोंडके यांनी आपल्या ‘द्विदल’ या पुस्तकात समर्पकरीत्या मांडलंय. ‘नार्सिसस’ आणि ‘कोव्हेलेंट बॉण्ड’ या नव्या युगाच्या दोन विज्ञानकथा अनोख्या आहेत. ‘नार्सिसस’ म्हणजे स्वत:च स्वत:च्या प्रतिमेचाही हेवा करावा इतका, की आपणच आपलं आयुष्य संपवावं. या कथेमध्ये लेखकांनी मानवी मनाच्या प्रसिद्धीच्या ईर्षेचा आणि हव्यासाचा मांडलेला सिद्धांत खरा आहे, हे पटवण्यासाठी आत्मक्लेशाची गाठलेली परिसीमा अत्यंत रोमहर्षक पद्धतीने उलगडली आहे. ही कथा वाचकांना उत्सुकतेच्या शिखरावर नक्कीच पोहचवेल यात शंका नाही. या पुस्तकातील दुसरी कथा आहे ‘कोव्हेलेंट बॉण्ड’. कथेच्या शीर्षकातच रसायन शास्त्राच्या व्याख्येनुसार ‘शेअिंरगने होणारा बॉण्ड.’ हा बॉण्ड अत्यंत मजबूत असतो व कोणत्याही रासायनिक प्रक्रियेने तो सहजपणे तुटत नाही. असा हा बॉण्ड सर्वांत मजबूत असतो. दोन्ही भावबंध स्वतंत्ररीत्या अपूर्ण असतात. एक वेगळाच, थक्क करणारा विचार ही कथा देऊन जाते.

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
समुदायाने जोडले
बंद