मुखपृष्ठ
धना

माझे शेल्फ

धना

इंग्रजी शीर्षक
Dhana
सारांश

उत्कंठावर्धक कहाणी... पै. गणेश मानुगडे हे नाव समाजमाध्यमांवर कुस्ती या खेळाबद्दलच्या सातत्यपूर्ण लेखनामुळे अनेकांना परिचयाचे आहे. त्यांची ‘धना’ ही कादंबरी अलीकडेच मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रसिद्ध केली आहे. पहिलवान असलेला धना आणि राजलक्ष्मी यांच्या परेाची ही कहाणी आहे. राजलक्ष्मी ही सर्जेराव नामक तालेवाराची कन्या. या सर्जेरावचा धनाने कुस्ती खेळण्यास विरोध असल्याने आणि धनाला तो अमान्य असल्याने त्याचा धना-राजलक्ष्मी यांच्या लग्नास विरोध करतो. पुढे नरभक्षक वाघाला ठार करून धना आपले शौर्य दाखवतो. यात जखमी झालेल्या धनाला इस्पितळात दाखल केले जाते. इथून या कहाणीला वेगळेच वळण मिळते. याचे कारण यशवंत महाराज यांची माणसे धनाचे अपहरण करतात. ते धनाला त्यांच्या फौजेचे नेतृत्व देऊ करतात. मात्र, त्यासाठी धनाला राजलक्ष्मीचा त्याग करावा लागणार असतो. राजलक्ष्मीवर प्रेम असूनही धना ती अट मान्य करून फौजेचे नेतृत्व स्वीकारतो. दरम्यान वाघाच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी गावात सूर्याजी हा वन खात्याचा अधिकारी येतो.राजलक्ष्मीचे धनावरील प्रेम पाहून तो या दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो. मात्र, यात अनेक घटना घडत जातात, त्यातून फौजेची गुप्तता धोक्यात येऊ लागते, राजलक्ष्मी आणि सूर्याजी यांना संपवण्याचा आदेश धनाला दिला जातो... जे सारे कसे आणि का घडते, याचा उलगडा होण्यासाठी ही उत्कंठावर्धक कादंबरी वाचावी लागेल."धना...तरुण पहिलवान. सर्जेराव या तालेवाराच्या मुलीवर राजलक्ष्मीवर प्रेम. धनावर वाघाचा हल्ला. गंभीर जखमी अवस्थेत धना वाघाला ठार मारतो. इस्पितळात उपचार घेत असताना त्याचं एका देशप्रेमी गुप्त फौजेकडून अपहरण. देशसेवेसाठी धनाला फौजेचं राजेपद देण्याची तयारी; मात्र त्याने घराचा आणि राजलक्ष्मीचा त्याग करण्याची अट. इकडे वनखात्याचा अधिकारी सूर्याजी गावात दाखल. सूर्याजीचं राजलक्ष्मीवर प्रेम; पण धनाच्या आणि तिच्या प्रेमाबाबत समजल्यावर त्या दोघांना एकत्र आणण्याचा निश्चय. धनाबाबत आणि त्या गुप्त फौजेबाबत सगळ्यांना कुणकुण लागते. फौजेची गुप्तता धोक्यात येते. त्यामुळे राजलक्ष्मी आणि सूर्याजीला संपवण्याचा फौजेचा निर्णय. त्यानंतर राजलक्ष्मीचं अपहरण. राजलक्ष्मीचं अपहरण कुणी आणि का केलेलं असतं? सूर्याजी त्या दोघांना एकत्र आणण्यात यशस्वी होतो का? सर्जेराव आणि सूर्याजीला फौजेचा ठावठिकाणा लागतो का? त्यांना धनाबाबतचे सत्य समजते का? या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी ‘धना’ ही उत्कंठावर्धक कादंबरी जरूर जरूर वाचली पाहिजे.

पहिली गोष्ट आपल्या व्यावसायिक बुद्धीला आव्हान देऊन संतुष्ट करते आणि दुसरी गोष्ट आपल्या भावनाप्रधान मनाला संतुष्ट करते.’ या दोन्ही गोष्टींचा उत्तम समन्वय जेम्स यांनी साधला आहे आणि त्यांच्यासारखं काम करणाऱ्यांसाठी ते एक उदाहरण आहेत. साधी, सोपी आणि ओघवती भाषा हे या पुस्तकाचं वैशिष्ट्य ठरावं. अर्थातच त्याचं श्रेय जेम्स यांच्याबरोबर सुनीता कट्टी यांनाही द्यायला हवं. तेव्हा घरातून काम करण्याच्या या प्रसन्न अनुभवाचे साक्षीदार व्हायला सगळ्यांना नक्कीच आवडेल ज्यांना घरातून काम करायची इच्छा आहे त्यांना हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल.

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
समुदायाने जोडले
बंद