मुखपृष्ठ

माझे शेल्फ

धर्मयुद्ध

इंग्रजी शीर्षक
Dharmayuddha
सारांश

महाभारतातील कर्ण या व्यक्तिरेखेने नानाविध पैलूंमुळे अनेक कलावंतांना भुरळ घातली आहे. कोणालाही लाजवेल अशी क्षमता, योग्यता आणि सामर्थ्य असूनही पदोपदी डावलला गेलेला कर्ण हे तेजोभंगाचे जिवंत प्रतीक आहे. अखंड संघर्षाने जीवनभर होरपळून निघालेल्या या व्यक्तिमत्त्वाचा वेध घेण्याचा प्रयत्न अनेकांनी आपल्या पद्धतीने केला आहे. कवच कुंडले, संजयाची दिव्यदृष्टी, श्रीकृष्णाचे सुदर्शनचक्र, त्याचा गोवर्धन पर्वत बोटावर उचलण्याचा पराक्रम, द्रौपदीच्या वस्त्रहरणप्रसंगी कृष्णाकडून तिला पुरविण्यात आलेली वस्त्रे अशा अनेक चमत्कृतिपूर्ण घटनांची साखळी महाभारतात आढळते. तरीही तत्कालीन वर्णव्यवस्थेविरुद्ध वेळोवेळी बंड पुकारणारा कर्ण इतर अनेक सामर्थ्यशाली व्यक्तिरेखांच्या भाऊगर्दीत प्रकर्षाने नजरेत भरतो. या कथेतील सर्वच व्यक्तिरेखा मानवी संसारातील सुखदुःखे अनुभवत असल्याची जाणीव होते. ही माणसेही आपल्यासारखीच संसारातील समस्यांना सामोरी जाताना दिसतात. नेमका हाच दृष्टिकोन स्वीकारून आणि पारंपरिक दृष्टी निग्रहाने अव्हेरून कर्णकथेचा वेध घेणारी रवींद्र ठाकूर यांची ‘धर्मयुद्ध’ ही कादंबरी. इतर मराठी कादंबऱ्यांमध्ये चित्रित झालेल्या कर्णापेक्षा ‘धर्मयुद्ध’मधील कर्ण मातीचे पाय असलेल्या व्यक्तिरेखांच्या अधिक जवळचा आहे.

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2019
पृष्ठसंख्या
388
भाषा
मराठी
किंमत
250.00
ISBN
9789353173135
समुदायाने जोडले
बंद