मुखपृष्ठ
एका सैनिकाचा मृत्यू

माझे शेल्फ

एका सैनिकाचा मृत्यू

इंग्रजी शीर्षक
Eka Sainikacha Mrutyu
सारांश

११ सप्टेंबर २००१ या दिवशी ओसामा बिन लादेनच्या अल कायद्याने अमेरिकेत हाहाकार उडवला. अल कायद्याच्या उच्चशिक्षित इस्लामी अतिरेक्यांनी न्यूयॉर्कच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरचे मनोरे उद्ध्वस्त केले. याला उत्तर म्हणून अमेरिकेने प्रथम अफगाणिस्तान आणि मग इराकवर ल्करी हल्ला चढवला. तेव्हापासून अमेरिकेची इस्लामी दहशतवादाविरुद्धची आंतरराष्ट्रीय लढाई चालू झाली. ती आजही चालूच आहे. आजही अमेरिकन सैन्य अफगाणिस्तानात आणि इराकमध्ये गुंतून पडलेले आहे. अफगाणिस्तानातली तालिबानची राजवट आणि इराकमधील सद्दाम हुसेनची राजवट अमेरिकेने संपवली. पण म्हणून तिथे शांतता प्रस्थापित झालेली नाही. अतिरेकी सतत घातपाती हल्ले करत असतात आणि त्यात निरपराध नागरिक, सैनिक मरत असतात. अफगाणिस्तान आणि इराकमध्ये उतरलेल्या सैन्यांमध्ये अमेरिकेसोबतच तिच्या दोस्त राष्ट्रांचेही सैनिक आहेत. लेफ्टनंट मार्क एव्हिसन हा असाच एक ब्रिटिश सैन्यातला एक अधिकारी. अगदी तरुण, अवघ्या २६ वर्षांचा लेफ्टनंट मार्क अफगाणी अतिरेक्यांच्या गोळीबारात ठार झाला. लेफ्टनंट मार्क एव्हिसनची आई मार्गारेट एव्हिसन ही मानसोपचार समुपदेशक आहे. मानसिक व्याधीने ग्रासलेल्या लोकांना त्या अवस्थेतून बाहेर काढणे हेच तिचे काम आहे. त्यामुळे मानवी मन हेच तिच्या अभ्यासाचे क्षेत्र आहे. आपल्या पोटच्या मुलाच्या अशा हकनाक मृत्युमुळे तिचे स्वत:चेच मन गलबलून गेले आणि त्यातून ‘डेथ ऑफ ए सोल्जर’ या पुस्तकाची निर्मिती झाली. दोनशे वर्षांची गौरवशाली परंपरा असलेल्या सॅण्डहर्स्ट या लष्करी महाविद्यालयातून मार्क एव्हिसन बाहेर पडला. लगेच त्याला वेल्श गार्ड या पथकात लेफ्टनंट म्हणून नेमणूक मिळाली. अफगाणिस्तान हाजी अलेम या ठाण्यावर प्लॅटून कमांडर म्हणून तो कार्यरत होता. ९ मे २००९च्या सकाळी अतिरेकी लपलेल्या ठिकाणांचे ‘कोम्बिंग ऑपरेशन’ करताना तो जबर जखमी झाला. वैद्यकीय उपचारांचा उपयोग न होता त्याचा मृत्यू झाला. अशी अनेक कोवळी पोरे रोज फुकट मरतायत. इस्लामी अतिरेक्यांनी संपूर्ण आधुनिक जगाविरुद्धच युद्ध पुकारलंय आणि त्यात अशी पोरे हकनाक बळी जातायत. मार्गारेट एव्हिसनचे हे पुस्तक म्हणजे अशा पोरांच्या आयांच्या विव्हल मन:स्थितीची प्रातिनिधिक कहाणीच आहे.

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
समुदायाने जोडले
बंद