मुखपृष्ठ
एके दिवशी

माझे शेल्फ

एके दिवशी

इंग्रजी शीर्षक
Eke Diwashi
सारांश

उत्कंठावर्धक, वाचनीय कादंबरी... एके दिवशी ही डॉ. गिरीश वालावलकर यांची कादंबरी मेहता पब्लिशिंग हाऊसने नुकतीच, देखण्या रूपात प्रकाशित केली आहे. या कादंबरीचे समर्पक, देखणे आणि रंगीत मुखपृष्ठ सतीश भावसार यांचे आहे. महामुंबईमध्ये, दिवस उलटताना... मध्य सुरुवातीलाच कादंबरीची झलक तीन-चार परिच्छेदांतून व्यक्त होते आणि वाचकांचे कुतूहल जागे होते. श्रीधर लिमये हा तरुण अतिश हुशार, केमिकल इंजिनियर, मंबईत येऊन स्वत:चा व्यवसाय सुरू करतो. उसाच्या रसापासून रंग बनवण्याचे तंत्रज्ञान त्याने विकसित केले. विशेषत: लोखंडावर हा रंग दीर्घकाळ झळाळी देतो. उत्पादनखर्च कमी, त्यामुळे तुलनेने त्याच्या रंगांच्या कमी दरामुळे तुलनेने त्याच्या रंगाच्या कमी दरामुळे सुरुवातीपासूनच त्याला विविध फर्निचर कंपन्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. त्याच्या रंगांची लोकप्रियता आणि मागणी सतत वाढत होती. कारखान्यासाठी, घरासाठी श्रीधरने कर्ज घेतले होते. दोन वर्षांनी, फर्निचर कंपन्यांकडून, दर तीन महिन्यांनी मिळणारे रंगांचे पैसे वेळेवर न मिळता, फक्त आश्वासनेच मिळू लागली. त्यामुळे बँकेकडून आणखी कर्ज घेतले गेले. हळूहळू पैशांच्या वसुलीअभावी कर्ज ओझे वाढू लागले. श्रीधर आणखी कर्जासाठी रत्नागिरीला आपल्या घरी जातो आणि एका पतसंस्थेत कर्जासाठी प्रयत्न करतो, पण कर्ज मिळत नाही. त्याचे वडील, शिक्षक म्हणून निवृत्तीनंतर मिळालेले सर्व पैसे श्रीधरला देतात.परंतु श्रीधरचा आर्थिक प्रश्न अधिकाधिक बिकट होत जातो. शेवटी तो पैसे वसुलीसाठी, मित्राच्या ओळखीने, एका पोलीस अधिकाऱ्याला भेटतो. त्यांच्या सल्ल्यानुसार, श्रीधर सुनील मोरेकडे भांडुपला जातो. सुनील मोरे आपल्या गँगच्या साहाय्याने, अल्पावधीतच श्रीधरची, सर्व मागील बाकी रक्कम वसूल करून देतो. त्यापैकी वीस टक्के रक्कम देण्याचे श्रीधरने मान्य केले होते. परंतु त्याचवेळी गणेश त्याच्या कारखान्याची, रंग निर्मितीच्या यंत्रांची बारकाईने पाहणी करतो, याचे श्रीधरला आश्चर्य वाटते. श्रीधर आणि त्याचा धाकटा भाऊ वसंता, आपल्या मामाच्या, दिवाकरच्या लग्नाला गुहागरला हजर राहतात. दिवाकर हा मंबईत, एका चाळीत, दोन खोल्यांच्या घरात राहणारा, व्यसनी माणूस. चारुलता त्याची बायको, दोन छोट्या मुलांसह कसातरी संसार चालवत होती. दिवाकरचा इस्टेट एजंटचा व्यवसाय फारसा चालत नसल्याने उधारीवर कसेबसे सर्व जगत होते. व्यसनीपणामुळे घराची वीस तोडण्याची पाळी येते. परब दारू पिऊन, पुन्हा एकदा, मध्यरात्री वसुलीसाठी येतो. त्यावेळी दिवाकर गायब असतो. परंतु उच्च शिक्षणासाठी मुंबईत भावाकडे आलेला वसंता, चारुशीलाला आपल्याजवळील फीसाठी पगारापोटी उसने घेतलेले पैसे देऊन, तिला भावनिक आणि शारीरिक आधार देतो. यशवंत जगताप आणि त्याचा मित्र सुधीर बालपणापासून मित्र. नववीत असताना १९९२ आणि १९९३ च्या मुंबईतील दंगलीत यशवंतच्या वडिलांचे छोटे दुकान दोनदा जाळले जाते. त्यामुळे यशवंतचे वडील खचून जातात. सर्वांनाच दोन वेळच्या जेवणाची भ्रांत होती. यशवंतचे शिक्षण फी अभावी थांबले. बँकेत कारकुनाची नोकरी मिळविण्याचे त्याच्या आई-वडिलांचे स्वप्न भंगले होते. यशवंत मिळेल ते काम करू लागला. हॉटेलमधील वेटरचे काम करताना त्याला, भोवतालच्या गुन्हेगारी विश्वाची जाणीव होते. सुधीरसह चटकन पैसे मिळवण्यासाठी ते टॅक्सीतून चैन करण्यासाठी जाणाऱ्या एका सरदारजीला लुटण्याची योजना आखतात. परंतु त्यांचा अंदाज चुकतो. परिणामी मोठी रक्कम चोरल्याचा त्यांच्याकडून गुन्हा होतो. रात्रभर पोलीस स्टेशनवर डांबून ठेवले जाते. पण संघटनेचे रेगेसाहेब त्यांना सोडवतात. केस मिळवली जाते. त्यानंतर यशवंत अन्य मित्रांच्या साहाय्याने गोदीतील माल चोरून, तो विकून पैसे मिळवू लागतो. हळूहळू मिळणाऱ्या पैशांतून यशवंत विविध धंद्यांत पैसे गुंतवून अल्पवधीतच श्रीमंत होतो. राजकीय पुढारी आणि गुन्हेगार यांची युती होते. एके दिवशी निवडणुकीच्या तोंडावर सुधीर यशवंताला त्वरित देश सोडण्यास सांगतो. मॉरिशसला कोणता उद्योग सुरू करायचा या चिंतेत असताना त्याला श्रीधरविषयी समजते. त्याच्याशी भागीदारी करून, उसाच्या रसापासून रंगाचे उत्पादन आपल्या देशात आणि मॉरिशसमध्ये करण्याचे ठरते. सत्तर टक्के हिस्सा यशवंतचा आणि उरलेल्या श्रीधरचा अशी विभागणी होते. श्रीधरला भागीदारीपत्रावर सही करावीच लागते आणि रात्रीच यशवंत, आईसह विमानतळावर जाण्यासाठी रवाना होतो. एका दिवसाच्या अखेरीला घडणाऱ्या विविध वेगवान घटनांचे विश्व वाचकांसमोर उलगडत जाते. शेवटपर्यंत वाचकांची उत्कंठा टिकून राहते. गिरीश यांनी सर्व पात्रे जणू वाचकांसमोर साक्षात उभी केली आहेत. राजकारण, गुन्हेगारी आणि सामान्यांचे विश्व एकमेकांत कसे गुंतले आहे हे तीव्रपणे जाणवते. कोकणातील निम्न मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील व्यक्तींना काळानुरूप कोणत्या प्रसंगांना तोंड द्यावे लागते याचे विलक्षण चित्रण कादंबरीत केले आहे.

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
समुदायाने जोडले
बंद