माझे शेल्फ
एकलव्य
महाभारता वरची बरीच पुस्तके वाचली आहेत परंतु एकलव्याची बाजू संपूर्ण पणे वाचावे असे बरयाच दिवसांपासुन डोक्यात होते आणि शरद दळवी लिखित एकलव्य पुस्तक सापडले आणि पुस्तकाने अक्षरशः झपाटून सोडले. एका शिष्याची गुरूप्रती अगाध, अगम्य श्रद्धा आणि तेही गुरू अनयाय करतोय हे माहीत असून देखील हे सर्व अक्षरशः थक्क करणारे आहे. एकलव्याने गुरुदक्षिणा म्हणून अंगठा दिला इथपर्यंत आपणा सर्वांनाच माहीत आहे परंतु अंगठा नसून देखील एकलव्य अर्जुन आणि कर्ण यांच्यापेक्षा उत्कृष्ट धनुर्धर होता युद्धात त्याने अर्जुनाला सळो की पळो करून सोडले हे वाचणे खूपच उत्कंठावर्धक आहे शिवाय एकलव्य निषादांचा राजा होता आणि आपले राज्य त्याने खूपच संतुलित पद्धतीने चालवून एक आदर्श निर्माण केला होता. अनेक माहित नसलेल्या गोष्टींचा उलगडा केल्याबद्दल लेखकाचे मनःपूर्वक आभार... मित्रांनो नक्कीच वाचा हे पुस्तक महाभारता मधील एक वेगळाच पैलू अनुभवायला मिळेल.
यशवंत, त्याची आई, श्रीधर आणि त्याचे कुटुंबीय, दिवाकर आणि चारुलता ही प्रमुख पात्रे दीर्घकाळ लक्षात राहतील अशीच आहेत. गिरीश यांनी कादंबरीत निर्माण केलेले प्रसंग जणू डोळ्यांसमोर एखाद्या चित्रपटासारखे साक्षात उभे राहतात, हेच गिरीश यांच्या लेखनाचे यश आहे. यशवंत, श्रीधर, चारुलता यांचे पुढे काय झाले असेल, अशी उत्सुकता वाचकाला वाटत राहते. कदाचित पुढील कादंबरीत लेखक काही आणखी धक्कादायक, उत्कंठावर्धक गोष्टी वाचकांसमोर ठेवतील. डॉ. गिरीश यांचे स्नेही, अभिनेता संदीप कुलकणी आणि अश्विनी भिडे (भा.प्र.से.) यांचे अभिप्राय कादंबरीच्या मलपृष्ठावर वाचावयास मिळतात. डॉ. गिरीश यांचा परिचयही त्यांच्या रंगीत छायाचित्रासह करून देण्यात आला आहे. एके दिवशी ही कादंबरी वाचनीय आणि उत्कंठावर्धक अशीच झाली.