माझे शेल्फ
एंड गेम
चीन आणि अमेरिका यांच्यातील दुश्मनी जगजाहीर आहे. त्यांच्यातील सुप्त संघर्षाची ही कादंबरी राजकीय डावपेचाची क्रूर कहाणी आहे. लेखक मॅथ्यू ग्लास हा एका अज्ञात ठिकाणी ब्रिटनमध्ये राहतो. हे त्याचे टोपणनाव आहे. या कादंबरीत अर्थातच अनेक पात्रे आहेत. राजकीय पा्श्वभूमीच्या कथानकात हे अपरिहार्य असते. युद्धपिपासू संरक्षणमंत्री एका भल्यामोठ्या देशाचे भवितव्य धोक्यात आणू शकतो. अमेरिकन राजदूत एक स्त्री असेल तर काय होऊ शकते. याचा भावी इतिहास नोंदविणारी ही वेगवान कहाणी घटनांना अधिक महत्व देऊन फुलविली आहे. भविष्यकाळात बुद्धिमत्तेच्या बळावर शहकाटशह देत मोठे देश एकमेकांवर कशी मात करु शकतील त्याचा अंदाज द्रष्टेपणाने इथे दिलेला आहे. डॉ. स्ट्रॅनगेलव्ह आणि गार्डन गेको ही महत्वाची पात्रे कोणता विध्वंस करु शकतील? वॉल स्ट्रीट, व्हाईट हाऊस, पेंटगॉन यांच्यातील संघर्ष अटळ आहे का? बरं, एकमेकांशी संघर्ष करणारी ही बलवान स्थळे जिंकतात का? बड्यांच्या झगड्यात छोटे हकनाक बळी का जातात? इसवी सन २०१८ मध्ये असे काही घडू शकते. पन्नास वर्षांपूर्वी क्युबा येथील बेटावर क्षेपणास्त्राचा एक पेच निर्माण झाला होता. त्यावरुन कादंबरीचा अखेरचा भाग रंगलेला आहे. भौगोलिक राजकीय कादंबरी हा प्रकार या कादंबरीची उल्लेखनीय बाजू आहे.