माझे शेल्फ
गाव तेथे देव
आंबेगाव हे कोकणातील एक छोटंसं गाव. शिवाजीराव भोसले हे गावातील प्रतिष्ठित जमीनदार. पिढीजात किती जमीन त्यांच्या नावाने आहे. आंबेगावात भोसल्यांचं पुढाकाराचं घराणं सर्वांत जुनं. ब्राह्मणाची चार घरं; बाकी सर्व गाव मराठ्यांचा व कुळवाड्यांचा. पण कुणी मोठा नाही; कुणी धाकटा नाही. सगळे एकोप्यानं राहत. पोटापाण्याचा प्रश्न आला, तर गावकरी शिवाजीरावांकडे धाव घेत. दैवी संकट आलं की त्र्यंबकगुुरुजींकडे जात. शंकराच्या देवस्थानाची देखभाल करणार्या पुरोहित त्र्यंबक गुरुजींना दोन मुलं- दोन मुली. त्यांतील मोठा श्याम हा शेती बघत असे. त्र्यंबक गुरुजींच्या पाठीवर १७ वर्षांनी झालेल्या श्रीधरला शिक्षणात गती होती. पण गावात कॉलेज नव्हतं. बाहेरगावी जायची गावची पद्धत नव्हती. मग शिकवण्या घेऊन त्याने आपला जम बसवला. सिंधूबरोबर लग्न झालं. सुखासमाधानानं तीन वर्षं संसार केला; पण एका मुलाला जन्म देऊन तिचा मृत्यू झाला. या आईवेगळ्या मुलाचं- जगन्नाथाचं घरात सर्व जण मायेनं लालन पालन करत. सिंधू नसलेल्या घरात श्रीधरचं मन रमेना. आंबेगाव सोडून श्रीधरने दुसरीकडे नोकरीस जाण्याचे ठरवले. इकडे शिवाजीरावांनाही आपल्या दोन मुलांच्या अपमृत्यूचा धक्का सोसावा लागला; पण मुलगी जान्हवीच्या हट्टाने आता गावात हायस्कूलचीही सोय झाली. जगन्नाथ आणि जान्हवी बरोबरीने शाळेत जात होते. आता शंकररावांच्या इच्छेविरुद्ध व गावाच्या रीतीविरुद्ध दोघांनी पुण्याला कॉलेजला प्रवेश घेतला. जान्हवीच्या आजीकडे- आई पुतळाच्या माहेरी ती राहू लागली. जगन्नाथ हॉस्टेलवर राहू लागला. दोघांच्या मनात एकमेकांविषयी प्रेमभावना निर्माण झाल्या. जान्हवीच्या आजीलाही हा हुषार जगन्नाथ नातजावई म्हणून आवडला. दरम्यान शंकररावांचा अकस्मात मृत्यू झाला. दोघांच्या कुटुंबांचा कितीही घरोबा असलातरी हा जातीपातीविरुद्ध केलेला विवाह पसंत पडणे शक्य नव्हते; पण शहराचे पाणी प्यायलेल्या आजीच्या पाठिंब्याने हा विवाह पार पडला. आजीच्या ओळखीमुळे व समाजातील दबदब्यामुळे शब्द टाकताच जगन्नाथला बँकेत मोठ्या पदावर नोकरीही मिळाली. श्रीमंत आजीने लग्नाची भेट म्हणून नवा बंगलाही नातीला व नातजावयाला दिला. जगन्नाथाच्या घरचे मात्र या सगळ्या घटनांमुळे त्याला दुरावले. मनोमन जगन्नाथ या सगळ्यामुळे थोडा दुःखी झाला होता; मात्र त्याला आता पाऊल मागे घेता येत नव्हते. परिस्थितीच्या विचित्र कैचीत तो अडकला होता. जान्हवीच्या खर्चीक स्वभावामुळे जगन्नाथची तिला पैसे पुरवण्यात तारांबळ उडू लागली. बँकेतही आडमार्गाने पैसा मिळवण्यासाठी तो उद्युक्त झाला. आपण करतो ते बरोबर नाही, हे कळूनही तो परिस्थितीपुढे हतबल झाला. नोकरी गमावण्याची वेळ त्याच्यावर येऊन ठेपली. त्यातच बँकेचे अधिकारीही जाब विचारायला पोलिसांना घेऊनच आले... काय घडले त्यानंतर... जगन्नाथ या संकटातून बाहेर आला का? कोणी मदत केली का? बापू आणि जान्हवीचा झगडा संपला का?
त्यातून ते कार्य अत्यंत गुप्तपणे चालणार असल्याने तीही काळजी त्यांना वाटत होती. व्हाईट हाऊसमध्ये राहत असताना (आठ वर्षे) एकदा अठरा हजार डॉलरच्या धनादेशाचा हिशेब लागत नव्हता. त्या वेळी ‘ट्रॅव्हल गेट’या नावाने त्यांच्यावर माध्यमांनी गदारोळ सुरू केला. अधिक तपासाअंती तो कार्यालयीन घोटाळा झाल्याचे लक्षात आले. या प्रकरणाबद्दल त्या म्हणतात, ‘बिल व मी व्हाईट हाऊसच्या भूमिकेत अननुभवी असू, पण राजकारणासारख्या आडदांड विश्वात पुरेसे मुरब्बी होतो. आघार दूर सारून सत्य जीवनावर आपले लक्ष कसे केंद्रित करायचे हे आम्ही जाणून होतो.’ राजकारणातील आपला आत्मविश्वास, खंबीरपणा, चातुर्य व बुद्धिचापल्य हे अनेक प्रसंगी दोघांनी सिद्ध केले होते. परराष्ट्रीय धोरणाच्या बाबतीत अत्यंत उदार सर्वसमावेशक धोरण स्वीकारून त्यांनी जवळजवळ ७८ देशांचा सदिच्छा दौरा करून अमेरिकेबद्दल अनुकूल मत बनवण्यात ते यशस्वी झाले. अनेकदा हिलरी यांनी एकटीनेही दौरे केले आहेत. जवळजवळ सर्व खंड, उपखंड, युरोपातील श्रीमंत व तंत्रज्ञानात विकसित असलेल्या राष्ट्रांपासून ते दक्षिण आफ्रिकेतल्या अत्यंत गरीब व मागासलेल्या राष्ट्रांपर्यंत व भारत, पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंका यासारख्या विकसनशील देशांत त्यांनी दौरे करून त्या त्या ठिकाणच्या समस्या जाणून घेतल्या. काही राष्ट्रांना सढळ मदतही केली. या विषयी एके ठिकाणी त्या म्हणतात, ‘मी जेव्हा राष्ट्राध्यक्षांच्या समवेत दौऱ्यावर असायची तेव्हा स्त्रिया व मुले यांच्याशी निगडित समस्या, आरोग्य सुविधा, सार्वजनिक शिक्षण, मानवी हक्क व पर्यावरण अशा प्रश्नांवर विशेष भर द्यायची’ (४१८). जॉर्डन इस्रायल यांच्यातील शांतता करारावर बिल यांच्या स्वाक्षऱ्या असून, हा करार बिलच्या पराराष्ट्रीय संबंधातला एक अत्यंत महत्त्वाचा ‘माईल स्टोन’ ठरला. त्या वेळी त्यांनी इजिप्तलाही भेट देऊन मैत्रीचे संबंध अधिक घट्ट केले. नेल्सन मंडेला यांच्या २७ वर्षांच्या प्रदीर्घ कारावासानंतर दक्षिण आफ्रिकेचे ते राष्ट्रप्रमुख बनले तेव्हा त्यांच्या सन्मान सोहळ्यास जाताना हिलरी यांनी आपल्या सोबत अनेक आफ्रिकन- अमेरिकन अधिकाऱ्यांनी नेले होते.हेतू हाच होता, की त्यांना ‘आपलं माणूस’ वाटणाऱ्या मंडेलांच्या भव्यदिव्य सत्काराचा आनंद त्यांनीही लुटावा. इतके हिलरी यांचे मन मोठे व कनवाळू होते. मंडेलांशी त्यांचे व त्यांच्या मुलीचे- चेल्सीचे सलोख्याचे संबंध होते. मुलीच्या निकोप वाढीसाठी दक्ष असणारी ही माता मुद्दाम आपल्या मुलीस दौऱ्यावर नेऊन वेगवेगळ्या अनुभवाची संधी द्यायची. एड्स जागृतीच्या कार्यासाठी बिल दांपत्य भारतात आले असताना सोबत त्यांची मुलगीही होती. तिनेही त्या कार्यात सहभाग घेतला होता. आपल्या मुलीने सामान्य मुलीप्रमाणे राहावे, असे संस्कार हिलरीने बालपणापासून तिच्यावर केले होते. जगात निरनिराळ्या देशांत जी हत्याकांडे सुरू होती, त्यावरून बिलने दहशतवादाचा इशारा आपल्या संरक्षण विभागास दिला होता. भविष्याचा वेध घेण्याची दृष्टी त्यांच्याजवळ होती. ते ज्या मार्गावरून चालत होते तो राजमार्ग नव्हता, उलट सत्त्वपरीक्षेचे, चारित्र्यहननाचे अनेक प्रसंग त्यांच्यावर आले. पण प्रत्येक वेळी असीम मनोबल असलेल्या हिलरीने स्वत: कवच होऊन त्यांचे संरक्षण केले. परमेश्वरावर त्यांची अढळ श्रद्धा होती. गंमत म्हणजे व्हाईट हाऊसमधील घडलेल्या काही घटनांमुळे अतिंद्रिय शक्तीवरही त्यांचा विश्वास होता. त्या स्वत:बरोबर कायम छोटी डायरी ठेवून आपल्या खाजगी कामाच्या नोंदीबरोबर स्फूर्तिदायक वचने, म्हणी व आपल्या आवडत्या पवित्र ग्रंथातील सुवचने लिहून ठेवत. एका कॅन्सर रुग्णाने लिहिलेल्या एका पुस्तकातील एका वाक्याने त्यांना आपल्या कार्याची नवी दिशा मिळाली. ते वाक्य म्हणजे, ‘माझ्या आजाराम मला जाणवलं, की आपल्या समाजामध्ये काहीतरी हरवलं आहे. ते म्हणजे काळीज व बंधुत्वाची भावना.’ संवेदनशील मनच अशा वाक्यातून काही बोध घेऊ शकते. आपल्या वैचारिक घडणीत इलिनार रुझवेल्ट यांचा फार मोठा वाटा असल्याचे त्या आवर्जून सांगतात. सन २०००च्या फेब्रुवारीत ‘न्यूयॉर्क सिनेट’साठी स्टेटयुनिव्हर्सिटीत आपली उमेदवारी जाहीर केली तेव्हा तिथल्या जनसमूहाचा उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांना मिळाला अन् त्या न्यूयॉर्क सिनेटच्या पहिल्या महिला सदस्य ठरल्या. त्या आनंददायी निकालानंतर त्या म्हणतात, ‘‘आठ वर्षे मला बिरूद होतं, पण पद नव्हतं, आता मात्र मी ‘नवनिर्वाचित सिनेटर’ होते.’’ (५५५) . बिलच्या आठ वर्षांच्या यशस्वी कारकिर्दीनंतर अल गोर यांना मागे टाकून बुश राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले अन् बिल, हिलरी व चेल्सी व्हाईट हाऊसमधून बाहेर पडले ते तिथल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या शुभेच्छा व आठवणीरूपी रंगीबेरंगी फुलांचा पुष्पगुच्छ बरोबर घेऊन! मुखपृष्ठावर हिलरी यांचे प्रसन्न छायाचित्र आहे. पान २१४ ते २३४ मधील सुंदर छायाचित्रे म्हणजे या पुस्तकाचे एक आकर्षण आहे. जणू हिलरी व बिल यांचा जीवनपटच आहे.