माझे शेल्फ
गबाळ
वाचून डोकं सुन्न करणारा पुस्तक. लेखक दादासाहेब मोरे त्यांना जेव्हा पासून समजायला लागलं, तेव्हा पासून ते ज्या जमातीत जन्मला आले त्या भटक्या जमातीची दुःखी व्यथा, त्यांची समाजात होत असलेली उपेक्षा, त्याचं जीवन हे या पुस्तकात उभं करण्याचं प्रयत्न केलाआहे. मिरज तालुक्यातील बाजार सलगरे शहरवजा खेडेगाव असलेल्या ठिकाणी एका कोंडिबा कुंभाराच्या शेतात ही भटकी जात वर्षातून एकदा नोव्हेंबर ते डिसेंबर एक महिना मुक्कामाला असायचा, दोन काठ्यावर पोती टाकून तयार केलेलं पाल म्हणजेच त्यांच घर. पालासमोर तीन दगड आणून ठेवायचे, रानातून लांकड गवऱ्या गोळा करून आणायचा. आणि आपली चूल पेटवायची. पाला समोर एक मोठा दगड आणून ठेवायचे, आणि त्यावर बसून अंघोळ करायची. बायकांनी देखील तिथंच अंघोळ करायची. त्याना लाज वाटायची नाही, बहुतेक त्यांच्या जीवनाच्या हिशोबात राजेच खातं उघडलं नसावं. त्या पाच एकरात जत्रा भरवल्या सारखी असायची. फक्त दुःख आणि लाचारी यांची देवघेवचं या जत्रेत चालत होती.अश्या पालाच्या जमातीत लेखक जीवन जगत मोठे झाले. दुसऱ्यांना खोटं सांगून त्याच्या कडून एखादं कोंबडी घेऊन खोटं म्हणजे तुझ्या घरात सूख निर्माण करतो,तुझ्या मुलांनी तु़झ ऐकांव असं करतो, तुझ्या संपत्तीत बरकत निर्माण करतो. असे खोटे सांगून त्या बदल्यात एखादी कोंबडी घ्यायची. या समाजाला समजत नाही का..? आम्हाला संपत्तीच्या शिखरावर उंभ करणारा माणूस भाकरीच्या तुकड्यासाठी दारोदार भीक का मागत फिरतो ? सुखी होण्याच्या खोठ्या आशेने समाज अश्या लोकांना कोंबड्या देतो. हे नवलच आहे.
सर्वकाही असूनही जे लोक नशिबाला दोष देतात त्यांच्यासाठी आपले आत्मचरित्र एखाद्या मार्गदर्शकासारखे आहे.