मुखपृष्ठ
गहाण पडलेली टेकडी

माझे शेल्फ

गहाण पडलेली टेकडी

इंग्रजी शीर्षक
Gahan Padleli Tekadi
सारांश

गहाण पडलेली टेकडी हा आदिवासी स्त्रियांच्या कहाण्यांचा संग्रह. या कहाण्या मारिजा स्रेस यांनी त्या अदिवासींमध्ये त्यांच्यापैकी एक होऊन, त्यांच्यात राहून लिहिल्या आहेत. ‘इथं तर हे नेहमीचंच’ या कथेतील मुकादम आणि ठेकेदाराच्या पाशवी वासनेला बळी पडून जीव गमवावी लागलेली नुकतीच वयात आलेली लाली...‘ठेवलेली बाई’ कथेतील पहिला नवरा गेल्यावर नाईलाजाने दुसरं लग्न करावं लागलेली आणि दुसऱ्या नवऱ्याने बाई ठेवली आहे, हे कळल्यावर बंड करू पाहणारी खातरी...‘दुभती गाय’ कथेतील आदिवासी स्त्रियांना हाताशी धरून गावात दूध सोसायटी उभी करू पाहणाऱ्या मीराबेनला पुरुषी मानसिकतेचा करावा लागणारा सामना...‘जो मैं ऐसा जानती’ कथेतील तारुण्यात पाय घसरलेली, पण नंतर नेकीने संसार करणारी मकू...‘बदलत्या काळाची पावलं’मधील ठार मारू पाहणाऱ्या नवऱ्याच्या आणि सासरच्या लोकांच्या तावडीतून सुटून आलेली, नंतर नानजीशी लग्न करून सुखाचा संसार करताना गावातील बायकांचा उद्धार करू पाहणारी फूली...काही शोषित आणि काही संघर्ष करू पाहणाऱ्या आदिवासी स्त्रियांचं वास्तव विश्व.

त्यात ‘नोस्टॅल्जिया’ ची भावना होतीच; शिवाय काहीशी अपराधीपणाचीही. विजय तेंडुलकर यांच्याशी अमेरिकतेच झालेल्या गप्पांतून या विषयानं आकार घेतला आणि वेलणकर यांनी जिद्दीनं या विषयावर काम करायचं ठरवलं. पुढं बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनांच्या निमित्तानं त्या अमेरिकेला जात राहिल्या आणि अधिवेशन संपल्यावरही तिथल्या ‘मराठी माणसां’बरोबर बोलत राहिल्या. त्यांना कोणीतरी ऐकणारं हवंच होतं. बोलायला त्यांच्यापाशी खू होतं; पण नुसतं त्यांचं ऐकून घेऊन शुद्धलेखन न लिहिता, त्यापुढे जाण्याचं लेखिकेने ठरवलं. हे काम अवघड होतं; पण न्यूजर्सीतील प्रिन्स्टन आणि न्यूयॉर्कमधील कोलंबिया या दोन विद्यापीठांच्या ग्रंथालयात बसून तिथल्या स्थलांतरितांविषयी जे काही मिळेल ते काढलं. इकडे भारतात आल्यावरही अनेकांना भेटत राहिली आणि अनेक धुंडाळत राहिली. त्या समाजशास्त्रीय प्रवास घडवणारं हे कादंबरीसारखं ओघवतं झालं आहे. हे पुस्तक वाचलं की या प्रश्नाचं उत्तर ‘तिथल्या’ मराठी माणसांबरोबरच आहे. किती कठीण होऊन बसलंय ते लक्षात येतं. वेलणकरांच्या परिश्रमांना एका अर्थानं ती पावतीच आहे.

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
समुदायाने जोडले
बंद