मुखपृष्ठ
गंधाली

माझे शेल्फ

गंधाली

इंग्रजी शीर्षक
Gandhali
सारांश

रणजित देसाई यांच्या स्वामी, श्रीमान योगी या कादंब-या खुप लोकप्रिय आहेत. त्या तुलनेत त्यांच्या इतर पुस्तकांचा जास्त उल्लेख केला जात नाही. गंधाली हा त्यांचा असाच एक कथासंग्रह आहे. इतिहासातील काही स्नेहबंधांवर हे पुस्तक आधारीत आहे. एकुण यात पाच ऐतिहासिक कथा आहेत. प्रेमाच्या विविध छटा या पुस्तकात पहावयास मिळतात. उदा. (१) जहांगीर, मेहरुन्निंसा उर्फ नूरजहाँ व शेर अफगाण यांचा प्रेमाचा त्रिकोण. (२) राजे रावरंभा निंबाळकर व माहेलका ही राजनर्तकी यांच्यातील स्नेह. माहेलका आपल्या चातुर्याने प्रेमाचे व राज्याचे कसे रक्षण करते हे वाचनीयच. (३) पन्नाशी गाठलेले बुजुर्ग बीनवादक बंदेअली व ऐन तारुण्यातील राजगायिका चुन्ना यांचे तरल संगीतमय प्रेम. संगीतावर सुरु होऊन संगीतावरच समाप्त झालेले आगळे प्रेम. (४)सर्वांच्या ओळखीची जोडी बाजीराव मस्तानी. (५) प्रेमाचं सोज्वळ नि उदात्त रुप म्हणजे राणी पुतळाबाई. शिवाजीमहाराजांच्या मृत्युनंतर गडावर काही कटु घडामोडी घडतात. याचा परिपाक म्हणजे त्यांना पतीचे अंत्यदर्शनही घेता येत नाही. काही दिवसातच पुतळाबाई संभाजीराजांबरोबर गडावर येतात. पती निधनाने त्या व्याकुळ असतानाही चार समजुतीच्या गोष्टी सर्वांना सांगुन परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न करतात. अशा या प्रेमाच्या विविध रुपांच्या हळुवार कथा. पुस्तकाचे नावही सुरेखच गंधाली. सुगंधित द्रव्ये ठेवण्याच्या पेटीला गंधाली म्हणतात. प्रेम हे चिरंतन असते या उक्तीप्रमाणेच ही सारी व्यक्तिमत्वे आपल्या स्नेहमय वर्तनातुन वाचकांच्या मनात कायम सुगंधाप्रमाणे दरवळत राहतात.

पुस्तकाची माहिती

पृष्ठसंख्या
160
भाषा
मराठी
किंमत
100.00
समुदायाने जोडले
बंद