मुखपृष्ठ
गो किस द वर्ल्ड

माझे शेल्फ

गो किस द वर्ल्ड

इंग्रजी शीर्षक
Go Kiss The World
सारांश

तरुणाईला हसत खेळत केलेलं मार्गदर्शन... गो, किस द वर्ल्ड’ (जा, सारी दुनिया कवेत घे!) हा माइन्ड - ट्री’ या सॉफ्टवेअर कंपनीचे सहसंस्थापक सुब्रतो बागचींच्या मृत्युशय्येवरच्या अंध मातोश्रींनी त्याना दिलेला संदेश हेच प्रेरणादायी पुस्तकाचं शीर्षक आहे. बुजु्ग व्यक्तींनं स्वानुभवाद्वारे, तरुणाईला हसत खेळत केलेलं मार्गदर्शन अतिशय मोलाचं ठरतं. बागचींनी आपली आंतरिक शक्ती ओळखून ती विकसित करताना कोणती आव्हानं पेलली आणि नव्या अनुभवांसाठी मनाची कवाडं उघडी ठेवून कोणता बोध घेतला, याचे विस्तृत विवेचन पुस्तकामध्ये आहे. सुब्रतो बागची यांचा जन्म १९५७ साली ओरिसा येथील पटनागढ येथे झाला. हे ‘माइन्ड ट्री चे सहसंस्थापक म्हणून प्रसिद्ध आहेत. पहिली आठ वर्षे तिचे सी. ओ. ओ. (चीफ ऑपरेटिंग ऑफिसर) म्हणून कार्यरत होते. २००८ साली सुब्रतो यांनी या कार्यातून बाजूला होऊन ‘माइन्ड ट्री’चे बागवान, माळी बनायचं ठरवलं. माइन्ड ट्रीच्या सर्वोत्कृष्ट १०० मनांची निगराणी ठेवणं आणि संस्थेच्या तीस विभागांना प्रशिक्षणाची मदत देणं हा त्यांच्या कार्याचा प्रमुख भाग आहे. सुब्रतोंच्या पत्नी सुस्मिता बागची प्रसिद्ध लेखिका आहेत. हे पुस्तक म्हणजे धैर्य, सचोटी आणि साहसाची एक असामान्य कथा आहे. ‘ह्रदय आणि आत्मा असलेली कंपनी संस्थापीत करण्यावर सुब्रतोबागचींनी दिलेला विशेष जोर हा आजच्या व्यवस्थापनात अत्यंत प्रचलित असलेल्या हायर अँड फायर (कामावर घ्या आणि डच्चू द्या) ह्या प्रथेवर रामबाण उतारा ठरेल.’ असे उद्गार मार्क टुली यांनी काढले आहेत. ही आत्मकहाणी सुब्रतो बागचींनी आत्मपरिक्षण करत आयुष्याचा आढावा घेतानाच पुन:प्रत्ययाचा आनंद लुटत लिहीलेली आहे. ओरिसाच्या लहान खेड्यांमध्ये गेलेलं बालपण, आईबापांनी आपल्या वागणुकीनं ठसा उमटवलेली उच्च नीतिमूल्यं, स्वत:चं व्यक्तिमत्व घडवताना आई वडिल आणि भावंडांची झालेली मदत जिवंत कुतूहल,नव्याच्या आनंद आणि घरातील ममता यांनी समृद्ध झालेलं बालपण हे सर्व पुस्तकाच्या पहिल्या भगात रेखाटलं आहे. दुसऱ्या भागात आपली ओळख होते, त्यांच्या चाळिशी पर्यंतच्या व्यावसायिक आयुष्याशी! राज्य शास्त्रातल्या पदवीनंतर ओरिसरच्या सचिवालयात कनिष्ठतम कारकून म्हणून व्यवसायाला सुरुवात करून डीसीएममध्ये मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून जाऊन, तत्त्वासाठी आणि सचोटी राखण्यासाठी डीसीएम सोडून कंम्प्युटर विक्रीच्या व्यवसायात जाऊन, अखेरीस विप्रो कंपनीत मोठं योगदान देऊन उच्चपद मिळवेपर्यंतचा यातला अत्यंत बोधप्रद प्रवास आपल्याला भारावून टाकतो. तिसऱ्या भागात ‘माइंड-ट्री’ची संस्थापना आणि प्रवास रेखाटला आहे़ मध्यायुष्यात विप्रो सोडून पुरेसा विचार न करता आपल्या स्वभावाला

विसंगत अशी नोकरी स्वीकारण्याची चूक त्यांनी प्रांजळपणे कबूल केली आहे. उच्च ध्येय ठेवून नवीन कंपनीची संस्थापना करण्यासाठी त्यांना समानधर्मीय कसे भेटले आणि ही मध्यायुष्यातली चूक सुधारताना त्यांनी अलौकिक अशी झेप समर्थपणे कशी घेतली, त्यात कोणत्या अडचणी आल्या आणि त्यातून ते सहसंस्थापक म्हणून यशस्वीरित्या कसे बाहेर पडले याचं अत्यंत ह्रद्य वर्णन तिसऱ्या भागात आहे. सामान्य परिस्थितीत जन्म घेऊन, उच्च नीतिमूल्यांची पायमल्ली न करता तेही असामान्य उंची गाठू शकले, पण तरीही पाय जमिनीवर घट्ट रोवून उभं राहणं, अंगी विनय राखणं, त्रयस्थपणे आपल्या यशची कारणमीमांसा करत असताना त्यासाठी कारणीभूत असलेल्यांना योग्य श्रेय देणं, सतत नव्या अनुभवांसाठी मनाची कवाड उघडी ठेवून त्यातून बोध घेत राहणं ह्या गोष्टी या आत्मकथनात जाणवतात. त्यामुळे सुब्रोतो बागची हे एक माणूस म्हणूनही फार श्रेष्ठ वाटतात. ते म्हणतात, ‘देशातील लाखो व्यावसायिकांना आणि मुख्यत्वेकरून भारतातील लहान लहान गावातील माणसांना तेही आयुष्यात यशस्वी होऊ शकतील असा संदेश देणं हा पुस्तक लिहिण्याचा हेतू आहे.’ पण याहूनही महत्त्वाचा संदेश पुढील ओळीत येतो. ‘पण यशस्वी होणं म्हणजे वैयक्तिकदृष्ट्या यशस्वी होऊन भैतिक सुखं मिळवणं नव्हे. यशस्वी होणं म्हणजे तेजाकडून आणखी उच्च तेजाकडे जाणं आणि जाताना समवेत इतरांनाही घेऊन जाणं. यशस्वी होण म्हणजे मोठा माणूस बनणं नव्हे! यशस्वी होणं म्हणजे चांगला माणूस बनणं!’ या माणसाला आयुष्यात अनेक देवदूत भेटले. जाताजाता संदेश देऊन गेले. प्रजासत्ताक दिनाच्या कवायतीनंतर घरी परतत असताना निवड समितीच्या प्रमुखाने सांगितले, ‘बाळा, कधीही लष्करात, नौदलात किंवा वायुदलात जाऊ नकोस.’ शिकागोला भेटलेल्या एका स्त्रीने म्हटले होते ‘तुम्ही जेव्हा एखादा पर्याय स्वीकारत असता, तेव्हा तुम्ही त्यांचे परिणामही स्वीकारत असता. ही गोष्ट मुलांच्या मनावर बिंबवणं एवढीच गोष्ट चांगल्या आईबापांच्या हाती असते.’ हवाईला एक ऐंशीपेक्षा जास्त वयाचा माणूस भेटला. तो म्हणाला,‘कधी निवृत्तीचा विचार करु नको. तुझं वय वाढलं की, कामाचा ताण कमी कर. कमी वेळ काम कर.

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
समुदायाने जोडले
बंद