माझे शेल्फ
ग्रोइंग अप बिन लादेन
११ सप्टेंबर, २००१ रोजी आजपर्यंतच्या सर्वात मोठ्या दहशतवादी हल्ल्यात अमेरिकेत चार प्रवासी विमानांचे अपहरण करून ती अमेरिकन लक्ष्यांवर आदळवतात. त्या पैकी दोन विमाने वल्र्ड ट्रेड सेंटरच्या गगनचुंबी इमारतींना धडक देतात आणि त्या कोसळतात हे जगभर प्रसारित झालेले दृश्य कोणीच विसरू शकत नाही. तीन एक हजार निरपराध लोक जीव गमावतात. त्या वेळेपासून दहशतवाद हा शब्द उच्चारताच प्रथम एकच चेहरा डोळ्यांसमोर येतो, ओसामा बिन लादेन! हा इतका कट्टर दहशतवादी बनला कसा हे कळणे अवघड होते; कारण अत्यंत धनाढ्य अशा कुटुंबात त्याचा जन्म झाला होता. पण आता त्याला ओळखणारे त्याच्या कुटुंबामधले कुणीही त्याच्याबद्दल बोलायला तोंड उघडायलाच तयार नव्हते. आणि मग खरे तर आश्चर्यच घडले, ओसामाची पहिली पत्नी नज्वा आणि त्यांचा चौथा मुलगा ओमर यांनी बोलण्याची तयारी दर्शवली. कट्टर धर्मवेडा, दहशतवादी, स्वत:च्या मुलांनीही आत्मघातकी हल्लेखोर बनावे अशी आशा बाळगणा-या ओसामा बिन लादेनच्या व्यक्तिमत्त्वाचे वेगळेच पैलू उलगडले. त्यांनी सांगितलेली चित्तवेधक कथा म्हणजेच ग्रोईंग अप बिन लादेन! ओसामा बिन लादेन हा जागतिक दहशत वादाचा चेहरा समजाला जातो. अमेरिकेवरील दहशदवादी हल्ल्यानंतर ओसामाला ठार करण्यासाठी अमेरिका गेली १०वर्षे प्रयत्न करत होती. ज्या प्रयत्नांना अखेर यश मिळालं. आणि लादेनचा शेवट झाला. अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्राला सतावण-य लादेन बद्दल कायमचा एक प्रकारचं औत्सुक्य राहिलेलं आहे. ज्यांच्या शेवटाकडे सर्व जगाचे डोळे लागून राहिले होते, ज्याचा मृत्यूची बातमी ऐकण्यासाठी सर्वांचे कान आतुर झाले होते. आणि ज्याला मारण्यासाठी अमेरिका जिवाचं रान करत होती, त्या ओसामानं आपल्या वैयक्तिक जीवनाबद्दल कमालीची गुप्तता पाळली होती. त्याच्या मृत्यूनंतर थोड्याफार प्रमाणात त्याचं व्यक्तिगत जीवन लोकासमोर आलं असलं तरी ओसामा या व्यक्तीबद्दल अजून सविस्तरपणे वाचावसं वाटत असेल तर ग्रोइंग अप बिन लादेन हे पुस्तक वाचावयास हवं. ओसामाची पहिली पत्नी नज्वा बिन लादेन यांनी जीन ससन यांच्या मदतीने ओसामाचे आयुष्य शब्दबद्ध केले आहे. ओसामा आणि त्याची अल कायदा दहशदवादी संघटना यांच्याबद्दल आजपर्यंत अनेक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत, पण खुद्द ओसामाच्या कुटुंबीयांनी लिहिलेलं हे पहिलच पुस्तक आणि म्हणूनच वेगळं.