मुखपृष्ठ
घाचर घोचर

माझे शेल्फ

घाचर घोचर

इंग्रजी शीर्षक
Ghachar Ghochar
सारांश

मध्यमवर्गीय वृत्तीवर प्रकाश टाकणारं पृथक्करण... ‘मेहता पब्लिशिंग हाऊस’ने विवेक शानभाग यांच्या ‘घाचर घोचर’ या कन्नड कादंबरीचा मराठी अनुवाद नुकताच प्रसिद्ध केला आहे. अपर्णा नायगांवकर यांनी हा अनुवाद केला असून, बंगळुरूमध्ये वास्तव्य करणाऱ्या एका कुटुंबची गोष्ट यात वाचायला मिळते. एका निम्नमध्यमवर्गीय कुटुंबाची नवश्रीमंतात गणना होऊ लागते, तेव्हा त्या घरातील वातावरणात होणाऱ्या बदलाबरोबरच जीवनमूल्येही कशी अगदी सहजपणे बदलत जातात, हे या कादंबरीत लेखकाने मोठ्या मार्मिकपणे दाखविले आहे. ललित साहित्यात अभावानेच आढळणारा हलकेपणा असलेली ही कादंबरी. अगदी थोडक्यात पण कुशलतेने मांडलेली कथा, उपरोधाची किनार, कारुण्याची झालर आणि विनोदाचा तडका अशी मस्त जमून आलेली भट्टी म्हणजे ही कादंबरी. मध्यमवर्गामध्ये कोणतीही घटना घडली, की तिची परिणीती अस्वस्थतेत होते. या कादंबरीतील घरातली माणसं एकमेकांना घट्ट धरून आहेत, पण आपल्या अस्वस्थतेतची कारणमीमांसा शोधणं, एकमेकांशी यासंदर्भात चर्चा करणं यापासून ते दूर राहिलेले दिसतात. कादंबरीतून लेखकाने भारतीय कुटुंबाचे अनेक पदर उलगडले आहेत. मध्यमवर्गीयांच्या टिपिकल वृत्तीवर प्रकाश टाकणारं हे पृथक्करण आहे.

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
समुदायाने जोडले
बंद