माझे शेल्फ
हाऊ स्टारबक्स सेव्हड माय लाइफ
मागील आठवड्यात मेहता पब्लिशिंग चा मेसेज आला How Starbucks saved my life या पुस्तकाच्या मराठी अनुवादा बद्दल... पुस्तकाचे नाव काहीतरी वेगळे आणि अनोखे वाटलं आणि लागलीच पुस्तक घेऊन आलो आणि काय सांगू मित्रांनो पुस्तक जसे वाचायला सुरुवात केले तसे गुंतत गलो पुस्तकात... एक अद्भुत अनुभव आहे हे पुस्तक वाचणे म्हणजे... छोट्याच पुस्तकात जीवनाचा केवढा गहन अर्थ सांगितला आहे लेखकाने... खरच प्रत्येकाने आवर्जून वाचावे असे हे अप्रतिम पुस्तक... वाचताना कधी टचकन डोळ्यात पाणी आले कळलेच नाही. जाहिरात क्षेत्रात उच्च पदावर काम करणार्या माईक ला जवळजवळ 25 वर्षांच्या नोकरी नंतर अचानक कामावरून काढले जाते, नेहमीच उच्च वर्तुळात वावरणाऱ्या आणि अशी परिस्थिती उद्भवेल याची कल्पना देखील न केलेल्या माईकला हा खूप मोठा धक्का असतो. नोकरी जाते तसेच घटस्फोट देखील होतो आणि त्यातच मेंदू मध्ये कर्करोगाची गाठ आहे असे जेव्हा डॉक्टर सांगतात तेव्हा तर माईक वर अक्षरशः आभाळ कोसळते. भविष्याची कसलीही तरतूद न केल्याने माईक अक्षरशः रस्त्यावर येतो आणि अशाच विमनस्क अवस्थेत असताना क्रिस्टल हि Starbucks मधील मॅनेजर माईकला जॉब ऑफर करते आणि कसलाही विचार न करता माईक हि नोकरी स्वीकारतो. Starbucks मधील नोकरी मध्ये सुरुवातीला धांदरलेला माईक थोड्याच दिवसात रुळतो आणि अनवधानाने मिळालेली हि नोकरी अगदी मनापासून करायला लागतो अगदी मग ते स्वच्छतागृह साफ करण्याचे काम देखील... परंतु नोकरी करता करताच माईकला अनेक गोष्टी गवसत जातात, समोरच्या व्यक्तीला आदराने वागवणे, कुठल्याही कामाला कमी न लेखणे, नव नवीन आव्हाने स्वीकारणे अशा एक नाही तर अनेक गोष्टी माईक शिकत जातो आणि त्यातूनच त्याला जीवनातील खरा आनंद खरे सुख उलगडत जाते. याच नोकरीत त्याला अगदी जीवाभावाचे मित्र भेटतात, मुलांसोबत निर्माण झालेला दुरावा कमी होतो.... अशी कलाकलाने फुलणारी माईकची सत्यकथा आपल्याला जखडून ठेवते आणि खूप काही विचार करायला लावते आपल्या जीवना बद्दल देखील.... मित्रांनो तुम्ही आत्ता जे काही काम करत असाल त्यात तुम्हाला आत्मिक समाधान लाभत आहे का? नसेल तर नक्कीच विचार करा आणि स्वतः ला आवडेल तेच काम करा जेणेकरुन वेळ निघून गेल्यावर हळहळ वाटू नये. पैसा खूप महत्वाचा आहे परंतु सर्वस्व नाही. पैसा, कीर्ती या गोष्टी तुमच्या आंतरिक समाधाना पेक्षा आणि आनंदा पेक्षा नक्कीच जास्त नाहियेत फक्त हि गोष्ट माणसाला वेळ निघून गेल्यावर लक्षात येते.... म्हणुनच म्हणतोय.... जिओ जिंदगी जी भर के... क्या पता कल हो ना हो...