माझे शेल्फ
हिरॉईन ऑफ द डेझर्ट
‘हिरॉईन ऑफ अ डेझर्ट’ हे डोन्या-अल्-नहि या एका हिंमतबाज स्त्रीचे पुस्तक आहे. ही स्त्री मूळची इंग्लिश. तिचे तेथील नाव आहे डॉना टेपन. केंब्रिजशायर, लंडन येथे तिचा जन्म झाला. डोन्याची वाढ अस्थिर कुटुंबात झाली. तिला आईबद्दल फारशी आस्था नव्हती. वडिलांबद्दलमात्र जिव्हाळा होता. तारुण्याच्या सुरुवातीच्या काळात तिला मुस्लिम मित्र लाभले. पुढे विवाह आणि स्थिर कौटुंबिक जीवन वाट्याला येऊनही चौकटतील जीवन न जगता, तिने एका वेगळ्या धाडसी आयुष्यात प्रवेश केला. या जगावेगळया धाडसी आयुष्याची कहाणी म्हणजे, हे पुस्तक होय. आखाती देशांतून अनेक श्रीमंत अरब तरुण इंग्लंडमध्ये येतात. अतिशय पारंपारिक कुटुंबात वाढलेले हे तरुण इंग्लंडमधील स्त्रियांच्या आधुनिकतेने प्रभावित होतात. त्यातून विवाहही होतात. या संमिश्र विवाहात, कालांतराने, विशेषत: मुलांना जन्म दिल्यावर हे तरुण आपल्या देशात जाण्यासाठी उत्सुक असतात. पाश्चिमात्य देशातील आधुनिक जीवनशैलीत मुलांना वाढविण्याबाबत त्यांची उदासीनता पती-पत्नीत बेबनाव निर्माण करते. यातूनच हे पुरुष मुलांना आपल्या देशात पळवून नेतात. या पलायनाबाबत पूर्णपणे अनभिज्ञ असणाऱ्या अनेक स्त्रिया, मुलांशिवाय नैराश्यपूर्ण जीवन जगतात. डोन्याचा हा लढा अशाच स्त्रियांसाठी आहे. डोन्याने जॉर्डन, लीबिया, मोरोक्को, इराक अशा कितीतरी ठिकाणांहून मुलांना आणून त्यांच्या मातांकडे सोपविले. ही बाब अर्थातच सोपी नव्हे. प्रत्येक देशाचे कायदे, नियम वेगवेगळे, त्यातून मुलांचे पासपोर्ट पित्यांकडे... अशा वेळी मुलांना पुन्हा इंग्लंडला आणताना ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतात, त्या बेकायदेशीर असूनही, मुलांना आईचे प्रेम मिळण्यासाठी डोन्या करते. या पुस्तकातील अनेक प्रसंग थरारक आहेत. तिने शेकडो आयांना त्यांची मुले पुन्हा मिळवून दिली आहेत. ‘मुलांना पळविणारी स्त्री’, अशी तिची प्रतिमा निर्माण झालेली असली, तरी ती मुलांच्या इच्छेविरुद्ध वागत नाही. मुलांना आई हवी असूनही जेव्हा पिता बळजबरीने ताबा सांगतो, तेव्हाच ती अशी कृती करते. त्यामुळे सतत मिळणाऱ्या धमक्यांनाही तोंड देते. आज तिच्या या कामाचे जगभरात कौतुक होत असले, तरी त्यातील धोका तिला माहीत आहे. डोन्याच्या या कामात तिचा पती महमूद याची विलक्षण साथ आहेच; पण आखाती देशांत आणि उत्तर आफ्रिकेत तिला मदत करणाऱयांचे एक जाळेच तयार झाले आहे. त्यात टॅक्सी ड्रायव्हरपासून ते अधिकारी, नेते, श्रीमंत अरबांचाही समावेश आहे. या पुस्तकातून ती या साऱ्या गोष्टी सांगता सांगता आपल्या पूर्वायुष्यात झालेल्या चुका, कौटुंबिक वातावरण यांचेही स्पष्टीकरण देते. पुस्तकाच्या अखेरीस ती आपल्या मानवतावादी कामाचे स्वरुप अधिक विस्तारताना दिसते. मशिदीत पावाचा तुकडा मिळेल या आशेने फिरणाऱ्या मुलांसाठी इराकमध्ये अनाथाश्रम उघडण्याचा, पळवून नेलेल्या मुलांची बाल्यावस्था जपण्याचा, आपल्या पळवून नेलेल्या मुलांना भेटायला जाणाऱ्या मातांसाठी निधी उभारण्याचा तिचा निश्चय आहे. तिच्या कामाचा हा परीघ पाहता, उच्च प्रतीच्या संवेदना बाळगणारी, दीनदुबळ्यांची सेवा करणारी सेवाव्रती, हे तिचे रुप मनात ठसते. हे पुस्तक डोन्याच्या जगावेगळ्या धाडसाची कहाणी तर सांगतेच; पण त्याचबरोबर पती-पत्नीमधील नात्यावर आणि भिन्न संस्कृतीतील परस्परसंबंधांवरही प्रकाश टाकते. सतत मिळणाऱ्या धमक्यांनाही तोंड देते. आज तिच्या या कामाचे जगभरात कौतुक होत असले, तरी त्यातील धोका तिला माहीत आहे. डोन्याच्या या कामात तिचा पती महमूद याची विलक्षण साथ आहेच; पण आखाती देशांत आणि उत्तर आफ्रिकेत तिला मदत करणाऱयांचे एक जाळेच तयार झाले आहे. त्यात टॅक्सी ड्रायव्हरपासून ते अधिकारी, नेते, श्रीमंत अरबांचाही समावेश आहे. या पुस्तकातून ती या साऱ्या गोष्टी सांगता सांगता आपल्या पूर्वायुष्यात झालेल्या चुका, कौटुंबिक वातावरण यांचेही स्पष्टीकरण देते. पुस्तकाच्या अखेरीस ती आपल्या मानवतावादी कामाचे स्वरुप अधिक विस्तारताना दिसते. मशिदीत पावाचा तुकडा मिळेल या आशेने फिरणाऱ्या मुलांसाठी इराकमध्ये अनाथाश्रम उघडण्याचा, पळवून नेलेल्या मुलांची बाल्यावस्था जपण्याचा, आपल्या पळवून नेलेल्या मुलांना भेटायला जाणाऱ्या मातांसाठी निधी उभारण्याचा तिचा निश्चय आहे. तिच्या कामाचा हा परीघ पाहता, उच्च प्रतीच्या संवेदना बाळगणारी, दीनदुबळ्यांची सेवा करणारी सेवाव्रती, हे तिचे रुप मनात ठसते. हे पुस्तक डोन्याच्या जगावेगळ्या धाडसाची कहाणी तर सांगतेच; पण त्याचबरोबर पती-पत्नीमधील नात्यावर आणि भिन्न संस्कृतीतील परस्परसंबंधांवरही प्रकाश टाकते.