मुखपृष्ठ
हल्दीराम

माझे शेल्फ

हल्दीराम

इंग्रजी शीर्षक
Haldiram
सारांश

ही कहाणी आहे एका अशा माणसाची ज्यानं एक प्रचंड मोठा खाद्य पदार्थ व्यवसाय उभा केला. राजस्थानातील एका छोट्याशा संस्थानात– बिकानेरमध्ये– हल्दिरामनं शेव हा खाद्य पदार्थ करून विकायला सुरुवात केली, तेव्हा तो विशीच्या आतला विवाहित तरुण होता. स्वतःच्या अक्कलहुशारीच्या बळावर त्यानं व्यवसायाची भरभराट केली. बिकानेरमध्ये यश मिळाल्यानंतर त्यांनी कोलकात्यामध्ये आपल्या व्यवसायाची नव्यानं मुहूर्तमेढ रोवली आणि तिथल्या मारवाडी लोकांच्या रसनेला एक वेगळाच, चटकदार पदार्थ– भुजिया– पुरवला. भरपूर शारीरिक कष्ट करण्याची तयारी आणि गिर्हाइकांना आवडेल असा चटपटीत, खमंग अन् खुसखुशीत खाद्य पदार्थ देण्याची प्रबळ इच्छा अन् त्याच्या जोडीला धोका पत्करण्याची धाडसी वृत्ती, एवढ्याच भांडवलावर हल्दिरामनी जी उत्तुंग भरारी मारली, त्याची कहाणी म्हणजेच हल्दिराम. हल्दिरामांच्या हयातीतच त्यांच्या व्यवसायाची भरपूर भरभराट झाल्याचं भाग्य त्यांनी अनुभवलं. त्यांच्या एका नातवानं– शिवकिशननं– नागपुरात स्वतःचा व्यवसाय सुरू केला, शेव बनवण्याच्या व्यवसायात नवे खाद्य पदार्थ – काजू कतलीसारखी मिठाई– निर्माण करण्याचं धाडस केलं, उपाहारगृहं काढून व्यवसायाचं आणखी एक दालन उघडलं. त्यांच्या दुसर्या एका नातवानं, मनोहरलालनं थेट राजधानी दिल्लीवर स्वारी केली आणि बघताबघता तेथील लोकांच्या मनावर अधिराज्य केलं. इतकच नव्हे, तर काही वर्षांच्या आतच व्यवसायाचा झेंडा देशाबाहेरही फडकवला.

तुकाराम ओंबळेंनी कसाब हालचाल करतोय हे बघून त्याला मिठी मारली. कसाबने गोळ्या झाडल्या. इतरांनी कसाबला धरून ठेवले. कसाब जिवंत हाती लागला. सलाम... मुंबई (बाची करकेरिया), भयानक वास्तव (ज्युलिओ रिबेरो), दहशतवादाचे उगम स्थान (हरिंहर बावेजा) वगैरे लेखही मुंबईच्या नागरिकांच्या मनोधैर्यावर प्रकाश टाकतात. सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटीही लक्षात आणून देतात. मुंबई हल्ल्यावरच्या या पुस्तकाने अतिरेक्यांच्या कारवायांचा बंदोबस्त करण्यासाठी सुरक्षायंत्रणांची सिद्धता आणखी कडक हवी हे लक्षात येते. संबंधित यंत्रणांनी त्याबाबत आपल्या कार्यप्रणालीत सुधारणा करायला हवी.

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
समुदायाने जोडले
बंद