मुखपृष्ठ
हरित युद्धे

माझे शेल्फ

हरित युद्धे

इंग्रजी शीर्षक
Harit Yuddhe
सारांश

पर्यावरणाच्या संरक्षणासाठी लढा.. जीवशास्त्रज्ञ आणि पर्यावरण पत्रकार बहार दत्त यांच्या ‘ग्रीन वॉर्स’ पुस्तकाचा रवींद्र भगवते यांनी केलेला मराठी अनुवाद म्हणजे ‘हरित युद्धे’ हे पुस्तक होय. बहार दत्त यांनी विकासाच्या नावाखाली पर्यावरण आणि निसर्गाचा नाश रणाऱ्या व्यवस्थेविरुद्ध युद्धच पुकारले होते. या क्षेत्रात धडाडीनं काम करताना बहार दत्त यांनी भारतात आणि परदेशात अनेक स्थळांना भेट देऊन विकास व पर्यावरण यांच्यातील संघर्ष जगासमोर आणला. बहार दत्त यांच्या या धाडसी प्रवासाची चित्तथरारक कहाणी या पुस्तकात वाचायला मिळते. ‘‘गारुडी आणि शिकारी’ या प्रकरणात दिल्लीजवळ असलेल्या गारुड्यांच्या वस्तीत १० वर्षं राहून बहार दत्त यांनी केलेलं अभ्यासपूर्ण संशोधन आणि गारुड्यांच्या पुनर्वसन कार्याची तपशीलवार नोंद आहे. गारुड्यांचं सर्पविषयक ज्ञान वापरून त्यांना सर्पशिक्षक बनवण्याचा प्रयत्न, शंभर गारुड्यांचा वाद्यवृंद बनवून त्याचे देश-विदेशात अनेक कार्यक्रम करणं. त्यांना इतर व्यवसायात प्रस्थापित करण्याचे प्रयत्न इत्यादीचं रोमहर्षक वर्णन वाचायला मिळतं. त्या पुढील प्रकरणात उत्तर प्रदेशातील एटावा जिल्ह्यात विमानतळ बांधण्यासाठी त्या जागेवर सारस पक्षी नाहीत, असं सांगण्यात आलं. तेव्हा बहार दत्त यांनी धोका पत्करून, यंत्रणेविरुद्ध लढा देऊन तो प्रकल्प मागे घ्यायला लावला. याचा रोमहर्षक वृत्तांत आहे. ‘खरी अवतार कहाणी’ या प्रकरणात ओदिसा राज्यातील वेदांत कंपनीच्या बॉक्साइट प्रकल्पाविरोधात तेथील डोंगरिया लढ्यात बहार दत्त यांनी केलेला संघर्ष वाचनीय आहे. अशाच प्रकारे इतर प्रकरणात ‘गोव्यातील बेकायदा खाणी आणि तेथील माफिया’, ‘उत्तराखंड येथील गंगेच्या आणि उपनद्यांच्या भागातील जल-प्रकल्प आणि निसर्गाचा विध्वंस’, ‘हरयाणामधील अभयारण्यातील नामशेष होणारे हॉग हरण’ आणि ‘अरुणाचलमधील दिबांग धरणामुळे ५००० हेक्टर्स जंगलातील जैवविविधतेचा नाश’ याविषयी लिहिलं आहे. ‘मेघालयातील जंगलतोड’, ‘चंबळ नदीतील सुसरींना वाळू माफियांच्या खोदकामापासून वाचवण्याचे प्रयत्न’, आसामच्या अभयारण्यातील हुलॉक वानर’ आणि ‘इंडोनेशियातील नष्ट होत चाललेले ओरांग उटान’ यांच्यावर केलेलं संशोधन आणि ज्ञानवर्धक माहिती पुस्तकात वाचायला मिळते. बहार दत्त यांच्या पुस्तकातील मूळ इंग्रजी निवेदनाची ओघवती शैली रवींद्र भगवते यांनी मराठी अनुवादात कायम राखल्यानं हे पुस्तक खूपच वाचनीय झालं आहे.

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
समुदायाने जोडले
बंद