मुखपृष्ठ
ईगीन

माझे शेल्फ

ईगीन

इंग्रजी शीर्षक
Igin
सारांश

भणंग जगण्याच्या गोष्टी… अगदी सुरुवातीला मराठी लेखक हे पांढरपेशा मध्यमवर्गातले होते. त्यामुळे मराठी साहित्यात मध्यमवर्गाच्या जीवनाचे चित्रण होते. आपल्या लेखकांचे अनुभवविश्व खूपच मर्यादित आहे. हा आक्षेप सतत असायचा आणि काही अपवाद वगळता तो खराही होता. नतर मात्र मराठी साहित्यात अनेक नवे, जोरकस प्रवाह आले. ग्रामीण, दलित जीवन प्रतिबिंबित झाले आहे अशा अनेक चांगल्या कथा, कादंबऱ्या, आत्मकथने यांनी आपले भावविश्व व साहित्यविश्व समृद्ध केले. असे असूनही साहित्यावरचा ‘मध्यमवर्गीय’ हा छाप काही मिटत नाही. या प्रस्तावनचे कारण म्हणजे महादेव मोरे यांचा नवीन कथासंग्रह ‘ईगीन’. पंधरा कथासंग्रह, अठरा कादंबऱ्या इतके विपुल लेखन त्यांच्या नावावर आहे. ईगीनमधील कथा १९९२ ते १९९९ दरम्यान विविध मासिकांतून आधी प्रसिद्ध झालेल्या आहेत. महादेव मोरे यांनी स्वत: शेतमळ्यात मजुरी करणे, टॅक्सी ड्रायव्हिंग करणे, पिठाच्या गिरणीत राबणे अशा प्रकारे आपले आयुष्य झेललेले आहे. या खडतर जगण्यात जे अनुभव वाट्याला आहे. जे जगणे पहायला मिळाले, तेच या कथांमधून आपल्याला सांगितले आहे. काही कथा पात्राच्या आयुष्यातील एखाद्या अनुभवाचे चित्रण करतात तर काही कथा पूर्ण आयुष्याची चित्तरकथा रेखाटतात. ‘हौस’ या पहिल्या कथेत टुरिस्ट टॅक्सी चालवणाऱ्या बापलेकांच्या आयुष्यातील एक दिवस दाखवला आहे. पंधरा रुपयाच्या भाड्यासाठी हे बापलेक तीन ठिकाणी गाडी ओढ्यात टाकतात, रात्रभर उपाशी राहतात, धोका पत्करतात. परत येताना त्यांची गाडी ओढ्यात फसते, ती बाहेर काढायला त्यांना पंधरा रुपये लागतात. मिळालेले सगळे भाडे खर्च होते. हालअपेष्टा, मेहनत लक्षात घेतली तर तोटाच झाला. मग बाप मुलाला विचारतो, ‘हा असा धंदा आहे, आता हौस फिटली का?’ ‘अजुनी चालतेचि वाट’ ही तरल, भावस्पर्शी ग्रामीण कथा लिहिणाऱ्या एका लेखकाची गोष्ट. साहित्य वर्तुळातील लोकांना ती कोणावर आधारित आहे हे सांगता येईल. पण वाचकांना लेखनाचे एक तत्व माहित होते. लेखकांचे लिखाण त्यांच्या अनुभवावर आधारित असते. पण तो अनुभव गाळून घ्यावा लागतो. अनेक फेरफार करावे लागतात. खेड्यातील गटबाजी, आपापसातील भांडणे यावर आधारित ‘पार्ट्या’ व ‘हिसका’ या दोन कथा आहेत. दोन्ही कथेत भांडणारी विरुद्ध बाजूंची जी दोन प्रमुख पात्रे आहेत. त्यांचा मुलगा व मुलगी मात्र पळून जावून लग्न करतात आणि आपल्या वडिलांचे गावात हसे करतात. ठसठशीत व्यक्तिरेखा उभ्या करणे हे मोरे यांचे ठळक जाणवणारे वैशिष्ट्य. भाषाशैली चांगली आहे. नगर वा ग्रामीण दोन्ही भाषा वापरलेल्या आहेत. निवेदन बहुधा नागर वा ग्रामीण दोन्हा भाषा वापरलेल्या आहेत. निवेदना बहुधा नागर भाषेत आहे. ग्रामीण भाषाही आपल्याला समजणारी आहे. ‘ईगीन’ म्हणजे विघ्न-संकटे असा एखाद्या माहीत नसलेल्या शब्दाचा अर्थ पटकन कळतो. चार-पाच कथांचा अपवाद सोडला तर बाकी सर्व कथा आत्यंतिक दारिद्री माणसांच्याच आहेत. हे जगणेच निरर्थक, अगदी हीन पातळीचे जगणे ही शोकांतिका आणि मरण म्हणजे सुटका या व्यक्तिरेखांचे काय मनोव्यापार, मनोविश्लेषण रंगवणार? लेखकाने सर्व कथा, गोष्ट सांगणे या पातळीवर ठेवल्या आहेत. पात्रांच्या स्थितीचे, दु:खाचे कढ आणणारे वर्णन नाही. सामाजिक प्रश्नांची पात्रांकरवी चर्चा नाही. सामाजिक भाष्य नाही, जातीव्यवस्थेला दूषणे देणे नाही. तत्वचिंतन नाही, नैतिक मूल्यांचा बडेजाव नाही. डाव्या किंवा तत्सम विचारसणीचा पुरस्कार नाही. नियतीवाद नाही. पहिल्या परिच्छेदात म्हटल्याप्रमाणे साहित्यावरचा मध्यमवर्गीय छाप कमी करायचा असेल तर आपण ईगीनमधील कथा अधिक समजून घेतल्या पाहिजेत.

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
किंमत
150.00
समुदायाने जोडले
बंद