माझे शेल्फ
इन्फर्नो
युराेपमध्ये इ.स. १३४६ ते १३५३ मध्ये प्लेगची माेठी साथ आली हाेती.त्या वेळी प्लेगला काळा मृत्यू - Black Death म्हटल्या जात हाेते. तेव्हा युराेपातील १/३ ( साडेसात काेटीच्या वर) लाेकसंख्या नष्ट झाली हाेती. पण तरीही अनेक इतिहासकारांनी युराेपातील प्लेगच्या साथीमुळे या काळात माेठ्या प्रमाणात लाेकसंख्या कमी झाल्यामुळे साथीच्या आधीच्या कित्येक समस्यांचे कसे निवारण झाले हे दाखवून दिले हाेते . अचानक आलेली प्लेगची साथ जरी भीषण असली , तरी त्यामुळे माेठ्या प्रमाणात मानवजातीच्या लाेकसंख्येत घट झाली. त्यामुळे विपुलता वाढली, सर्व प्रकारच्या संधी उपलब्ध हाेत गेल्या. म्हणून युराेपात नंतर जे " कलेचे सुवर्णयुग " अर्थात पुनरुज्जीवन काळ अवतरला त्यासाठी मानवजातीची घट आणि विपुलता हे घटक सहाय्यभूत ठरले, असे बरेच इतिहासकार मानतात. लाेकसंख्येच्या विस्फाेटाच्या याच विषयाला धरून एक " इन्फर्नाे " नावाची कादंबरी आहे . ती डँन ब्राऊन यांनी लिहिलेली आहे. मराठीमध्ये याचा अनुवाद अशाेक पाध्ये यांनी केला आहे. शोधा म्हणजे तुम्हाला ते सापडेल’ हे शब्द चिन्हशास्त्रज्ञ रॉबर्ट लँग्डन याच्या डोक्यात घोळत असताना तो रुग्णालयात जागा झाला. आपण कुठे आहोत, येथे कसे आलोत, हे त्याला आठवेना. जी एक गूढ वस्तू त्याच्याजवळ होती, त्याबद्दलही त्याला सांगता येईना. त्याला ठार मारण्याची धमकी मिळाल्याने सिएना ब्रुक्स या तरुण डॉक्टरणीसोबत त्याने पलायन केले. मग इटलीच्या फ्लॉरेन्स शहरात त्याचा पाठलाग सुरू झाला. प्राचीन व ऐतिहासिक वास्तूंच्या खाचाखोचा माहीत असल्यामुळे आपला पाठलाग करणार्यांना तो गुंगारा देऊ शकत होता. डान्टेचे महाकाव्य ‘इन्फर्नो’मधील काही काव्यपंक्तींच्या साहाय्याने तो रहस्याचा मागोवा घेत चालला होता. ते रहस्य प्राचीन शिल्पे, चित्रे, इत्यादींमध्ये सांकेतिक स्वरूपात लपलेले होते. ते उलगडले तर जगाला एका भयानक संकटातून वाचवता येणार होते... युरोपातील पाश्र्वभूमीवर लिहिलेली डॅन ब्राउनची रहस्यमय व थरारक कादंबरी! चोवीस तासात घडणार्या या घटना वाचताना वाचकाला अक्षरश: भोवळ येऊ लागते; ही कादंबरी पहिल्या पानापासून ते शेवटच्या पानापर्यंत वाचकाला खिळवून ठेवते!