मुखपृष्ठ
इनसाइड द गॅस चेंबर

माझे शेल्फ

इनसाइड द गॅस चेंबर

इंग्रजी शीर्षक
Inside The Gas Chamber
सारांश

नरकात जगलेला माणूस.. इनसाईड द गॅस चेंबर्स दुस-या महायुध्दाच्या काळात नाझींनी ज्यू लोकांच्या अमानुष कत्तली केल्या. त्यांना गॅस चेंबर्स मध्ये कोंडून मारण्यात आलं. लाखो ज्यू लोकांची अशाप्रकारे कत्तल करण्यात आली. गॅस चेंबर मध्ये तडफडून मरणा-या याप्रेतांना भट्टीत टाकून जाळण्यात आलं. अनेकदा जिवंत भट्टीत टाकले जात असे. हे काम देखील ज्यू लोकांकडून करून घेण्यात येई आणि नंतर त्यांना देखील ठार मारलं जात असे. त्यापैकी जे मूठभर लोकं जिवंत वाचले त्यापैकी सुदैवाने वाचलेला श्लोमो वेत्सानिया हा एक ज्यू तरुण. त्याने अनुभव कथन केलेल्या गॅस चेंबरचं वर्णन असलेलं हे पुस्तक. ``इनसाईट द गॅस चेंबर``... नरक म्हणजे काय असतो तो आपल्यासमोर येतं. लहान मुले, स्त्रिया, वृध्द महिला यांना ज्यावेळी आणलं जात होतं. तेव्हा त्यांचे कपडे काढून या गॅस चेंबर मध्ये पाठविण्यात येई. हे गॅस चेंबर्स कसे होतं, मृत्यूला सामोरे जाणाऱ्या लोकांच्या भावना काय होत्या हे सारं श्लोमो यांनी सांगितलं आहे. श्लोमो आणि त्याच्या कुटुंबाला ग्रीस मधून हद्दपार केल्यानंतर बिर्केनो येथील छळछावणीत आणण्यात आले. त्याची आई आणि दोन लहान बहिणी कधीच दिसल्या नाहीत. श्लोमोला झॉंडरकमांडो म्हणून ज्यू लोकांना गॅस भट्टीत टाकण्याचं, नंतर प्रेतांची विल्हेवाट लावण्याचं काम देण्यात आलं. हा नरकच होता. त्याचे वर्णन श्लोमो सांगत असताना अंगावर काटा येतो. आपल्याला मरणासाठी गॅस चेंबर मध्ये नेले जात आहे, हे समजल्यावर भयभीत झालेले, लहान मुलांना पोटाशी कवटाळणाऱ्या आया, रडणारे बालके, त्यांना गोळ्या घालणारे, विकृत छळ कऱणारे जर्मन, एक लहान बाळ गॅस चेंबर्स मधून जिवंत बाहेर पडतो कारण तो आईचं दूध पित असतो. ते पाहून संतापलेला जर्मन त्या बालकाला लागलीच गोळ्या घालतो.....सारंच भेसूर, सुन्न करणारं. पुस्तक सलग वाचता येत नाही. हात थरथरतात, छाती धडधडते. सैतानाही लाजवेल असे कृत्य पाहून संवेदना बधीर होतात.

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
समुदायाने जोडले
बंद