मुखपृष्ठ
इंटरव्हेन्शन

माझे शेल्फ

इंटरव्हेन्शन

इंग्रजी शीर्षक
Intervention
सारांश

प्रसिद्ध लेखक रॉबिन कुक हे नाव आजपर्यंत आपण आधुनिक आरोग्य व्यवस्थेबद्दल कित्येक गंभीर, गूढ व आश्चर्यजनक रहस्यभेद करणारे म्हणून सुपरिचित आहेत. प्रस्तुत कादंबरी एक नवीनच पैलूवर अर्थातच आरोग्य म्हणजेच असाध्य रोगावरील चिकित्साप्रणालीवर बेतले आहे. गंमत महणजे ही कादंबरी इतर अनेक सुप्रसिद्ध कादंबरीकारांप्रमाणे उदा. डॅन ब्राऊन किंवा रहस्यमय गोष्टींप्रमाणे इजिप्त, रोम व्हॅटीकन सिटी व अर्थात न्यूयॉर्कमध्ये फिरली आहे. कॉलेजमधील एक त्रिमुर्ती गटातील वैविध्यपूर्ण, अभ्यासू विद्यार्थी पात्रे यात आहेत. त्यांच्या भिन्न आवडींमुळे प्रत्येक जण वेगवेगळ्या क्षेत्रात प्राविण्य मिळवून प्रसिद्ध स्तरावर कार्यरत आहे. कीरोप्रॅक्टर म्हणजे बोगस, अल्पशिक्षित व स्वत:स डॉक्टर म्हणवून घेणारे हे भोंदू समाजात कसे पसरले असून व्याधींवर भयानक इलाज करतात. त्यांचा भंडाफोड करण्याचे हे व्रत डॉ. रॉबिन कुक यांनी येथे उत्कंठापूर्ण शैलीत मांडले आहे. कादंबरी वाचताना खाली ठेववत नाही. इतकी उत्सुकता ताणली जाऊन वाचक पुढचे वाचन करतो.

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
समुदायाने जोडले
बंद