मुखपृष्ठ
जमैका इन

माझे शेल्फ

जमैका इन

इंग्रजी शीर्षक
Jamaica Inn
सारांश

डॅफने द्यू मोरियेर यांच्या ‘जमेका इन’ या पुस्तकाचा अनुवाद स्नेहल जोशी यांनी केला आहे. ही कथा आहे अनुराग, फसवणूक आणि मृत्यूची एका भयानक कारस्थानाच्या जाळ्यात अडकलेल्या एका सुंदर तरुणीची. ही सुंदरी एका पाजी माणसाच्या प्रेमात आकंठ बुडते आणि त्याचा परिणा म्हणून स्वतःवर अनेक संकटं ओढवून घेते. डॅफने द्यू मोरियेर यांच्या इतर जगप्रसिद्ध कादंबऱयांप्रमाणेच या कथेतही तीच अनिश्चितता आणि उत्कंठा आहे.मेरी येलान ही तरुण मुलगी अनाथ झाल्यामुळे आपलं मूळ गाव सोडून इंग्लंडमधल्या कॉर्नवॉल भागात बॉडमिन इथे राहायला येते, तिथे तिची मावशी पेशन्स आणि मावसा जॉस मेरलिन हे ‘जमैका इन’ नावाची प्रसिद्ध खाणावळ चालवत असतात. लवकरच मेरीला कळून चुकतं की, ‘जमैका इन’ला ोक घाबरतात. कारण जॉस मेरलिन हा एक गुन्हेगारी टोळी चालवतोय. हे टोळीवाले कॉर्नवॉलच्या किनाऱ्यावर अंधाऱ्या रात्री प्रवासी गलबतांना चुकीचे इशारे देतात. परिणामी ती गलबतं खडकांवर आपटून फुटतात. मग हे टोळीवाले त्या गलबतांवरच्या सर्व माणसांना ठार मारून सगळा माल लुटतात. मेरी भयभीत होते. आपली मावशी तिच्या नवऱ्याच्या या भयंकर कारस्थानांमध्ये पुरती फसली आहे; आपणच तिला वाचवायला हवं असं समजून त्या दिशेने प्रयत्न करणाऱ्या मेरीला एक दिवस असंही कळतं की, जॉस मेरलिन या टोळीचा मुख्य बॉस नाही. स्वत: जॉस त्या अज्ञात बॉसच्या हातातलं खेळणं आहे. मग कोण असेल तो खरा खलनायक? बॉडमिनच्या मैलोगणती पसरलेल्या माळावर फिरताना मेरीला आणखी तीन व्यक्ती परिचित होतात. जॉसचा धाकटा भाऊ जेम मेरलिन, जमीनदार बसात आणि दयाळू पाद्री डेव्ही, जॉस काका आणि पेशन्स मावशी यांचा खून होतो. मेरीच्या नको तिथे कडमडण्यामुळे अखेर खलनायकाचं भांडं फुटतं, तो मेरीला ओलीस धरून समुद्रमार्गे स्पेनला पळून जाऊ पाहतो, पण अखेर जेम मेरलिनच्या गोळीला बळी पडतो. अशा तोंडावल्याची असंख्य कथानकं आपण गेल्या पन्नास-साठ वर्षांत विविध रहस्य कादंबऱयांमध्ये वाचली आहेत किंवा रुपेरी पडद्यावर पाहिली आहेत. त्यामुळे खरा खलनायक कोण असेल हे आपण तर्काने नक्कीच जाणलं असेल. मूळ इंग्रजी कादंबरी १९३६ साली लिहिली गेली आणि प्राचंड गाजली. दॅफ्ने द्यु मॉरिए या ब्रिटिश लेखिकेची ही चौथी कादंबरी होती. दॅफ्ने द्यु मॉरिएने यात चितारलेला इंग्लंडमधल्या कॉनवॉल भागातला निसर्ग, विशेषत: बॉडमिनच्या अफाट माळाची वर्णनं वाचकाला खिळवून ठेवतात. १९३९ साली या कादंबरीवर याच नावाचा चित्रपट रहस्यचित्र सम्राट आल्फ्रेड हिचकॉक याने काढला. त्यात चार्ल्स लॉटन या त्यावेळच्या प्रख्यात नटाने खलनायाकाची भूमिका केली होती. मात्र स्वत: दॅफ्ने द्यु मॉरिएला चित्रपट पसंत पडला नव्हता. कारण चार्ल्स लॉटनने मूळ कथानक स्वत:च्या पसंतीनुसार बदलून घेतलं होतं. ब्रिटनमध्ये ख्यातनाम पुरुषांना राजघराण्यातर्फे ‘सर’ ही पदवी दिली जाते. तशीच ख्यातनाम स्रियांना ‘डेम’ ही पदवी दिली जाते. डेम म्हणजे बाईसाहेब. डॅफ्ने द्यु मॉरिए आणि अॅगाथा खिस्ती या दोन महान रहस्यकथा सम्राज्ञींना इंग्लंडच्या राणीने ‘डेम’ ही पदवी दिली होती. डेम दॅफ्ने द्यु मॉरिएच्या प्रस्तुत ‘जमैका इन’चा मराठी अनुवाद मात्र अगदी सपक झाला आहे. मूळ इंग्रजीतल्या निसर्गवर्णनांचा प्रभावी प्रलय मराठीत अनुभवाला येत नाही. मांडणी, मुखपृष्ठ, निर्मिती अगदी तांत्रिक अंगे सुबक.

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
समुदायाने जोडले
बंद