मुखपृष्ठ
ज्ञानसूर्याची सावली

माझे शेल्फ

ज्ञानसूर्याची सावली

इंग्रजी शीर्षक
Dnyansuryachi Sawali
सारांश

मंजुश्री गोखलेलिखित ‘ज्ञानसूर्याची सावली’ ही कादंबरी निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपानदेव आणि मुक्ताबाई या मराठी माणसाच्या काळजाचा विषय असलेल्या चार भावंडापैकी सोपानदेवांचं चरित्र रेखाटते. वडील विठ्ठलपंतांचा संन्यास, गुरूच्या आज्ञेने परत गृहस्थाश्रम स्वकारणं, मग समाजाने केलेल्या हेटाळणीमुळे पत्नी रुक्मिणीसह केलेला देहत्याग या सगळ्यातून ‘संन्याशाची पोरं’ म्हणून हिणवली गेलेली ही चार मुलं... प्रत्येकाचं व्यक्तिमत्त्व वेगळं तरीही एकमेकांमध्ये विरघळलेलं आणि त्यांच्यातही ज्ञानेश्वर म्हणजे साक्षात ज्ञानसूर्य. त्यामुळेच स्वत:चं व्यक्तिमत्व असूनही इतर भावंडं या ज्ञानसूर्याची सावली ठरली. त्यातल्या एका सावलीचं म्हणजेच सोपानदेवांचं चरित्र या कादंबरीत आहे. या चारही भावंडांचं जगणं आणि ज्ञानदेवांच्या समाधीनंतर सोपानदेवांनी घेतलेली समाधी इथवरचा प्रवास कादंबरीत वाचायला मिळतो. या अलौकिक भावंडांचा लेखिकेच्या कल्पनेतून झालेला जीवनप्रवास वाचनीय आहे.

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
समुदायाने जोडले
बंद