माझे शेल्फ
झांगडगुत्ता
झांगडगुत्ता म्हणजे...
मानवी मेंदूतील अनेक विस्कळीत विचारांचा... 'गुत्ता', 'घोळ'.. म्हणजे 'झांगडगुत्ता', समाजात वावरतांना अनेक.. झांगडगुत्ते.. निदर्शनास येतात. नळावर पाणी भरतांना.., बाया-बापड्यात झांगडगुत्ता होतो. बांधकामावर मिस्त्री-मजुरात झांगडगुत्ता होतो. घरात.., सासू-सुनेत तर रोज झांगडगुत्ता होतोच होतो.
ऑफिसात, साहेबांचा कर्मचाऱ्यांशी..झांगडगुत्ता होतो. एकाच घरात, नास्तिक आणि आस्तिक असल्यावर, कधी न संपणारा धार्मिक झांगडगुत्ता होतोच असतो. नवरा- बायकोचा तर खेळच तो. पल-पल.. घडी-घडी झांगडगुत्ता..
अंतरजातीय प्रेमी युगलात, घरच्यांच्या विरोधात झांगडगुत्ता असतो. अन शेजाऱ्या पाजाऱ्यात तर झांगडगुत्तेच... झांगडगुत्ते.., एका-चढी एक.., पहले 'बाचा-बाची', नंतर 'पकडा-पकडी', मग.. 'हाना-मारी..' अनं आखरी 'कोर्ट-कचेरी..' कोर्टाच्या झगड्याच्या 'चार' पायऱ्या मधली, प्रथम पायरी म्हणजे 'झांगडगुत्ता'.