माझे शेल्फ
झॅप्ड
न्यूयॉर्कमध्ये अचानक झालेला ब्लॅकआऊटच्या पार्श्वभूमीवर घडणाऱ्या अनेक घटनांची एक छोटेखानी कादंबरी. हॉलीवूडमध्ये प्रवेश करण्यासाठी एक धडपडणारी नटी, तिला घटस्फोट दिलेला तिचा नवरा, आयुष्यात आलेल्या एका कटू अनुभवामुळे तरूणांना जाळ्यात फसवून त्यांचा छळ करणरी दुसरी एक तरूणी, ब्लॅकआऊटच्या रात्रीचा फायदा उचलणारे भुरटे, चौकाचौकांत जमलेली तरूणाई, न्यूयॉर्कच्या मॅनहटन भागातील एका रात्रीत घडणाऱ्या अनेक कथांची सांगड बेमालूमपणे एकमेकांत मिसळलेल्या या पाठलाग कथेत अनुभवता येतात.लोकप्रिय अमेरिकन लेखिका करोल हिगिन्स क्लार्क हिच्या रेगन रैली मालिकेतील ‘झॅप्ड’ ही एक उत्कंठावर्धक रहस्यकथा. लॉरेन लिली ही हॉलीवूडमध्ये पदार्पण करू पाहणारी एक नटी. न्यूयॉर्कच्या जे.एफ.के विमानतळावरून टॅक्सीतून मॅनहॅटनमधल्या तिच्या घरी परत येत असते. वाटेतच तिचा धनाढ्य नवरा फोन करून घटस्फोटाची नोटीस देत असल्याचे तिला सांगतो. तेवढ्यात न्यूयॉर्क शहराचा वीज पुरवठा खंडीत होतो आणि संपूर्ण शहर काळोखात बुडून जाते. या काळोखात अनेक गोष्टी होत असतात. एका छोट्या जागेत ‘स्टँड अप कॉमेडीचा शो’ बघण्यासाठी वीकएन्डच्या निमित्ताने गर्दी झालेली असते. दोन व्यक्ती लॉरेनच्या घराचे कुलूप तोडण्याच्या खटपटीत असतात. एका निष्पाप तरुणाला आपल्या जाळ्यात फसवून जन्माची अद्दल घडवण्याच्या उद्देशाने एक तरुणी त्याच्या मागे हात धुवून लागलेली असते. सगळी तरुणाई नाक्यावरच्या बारमध्ये जमा होते. घरात बसून अंधारात दुसरे काहीच करण्यासारखे नसल्याने लोक चौकाचौकात जमून ‘बार्बेक्यू पार्टी’ करत धमाल करत असतात. ब्लॅकआउटच्या रात्री वरवर वेगवेगळ्या वाटणाऱ्या या घटनांची सांगड घालत लेखिकेने मोठ्या कौशल्याने एका उत्कंठावर्धक कथानकाची गुुुंफन केली आहे. कथानक न्यूयॉर्कच्या मॅनहॅटन या भागात घडते. जेथे दिवे दिवसासुद्धा चालू असतात त्या मॅनहॅटनवर आता अंधाराचे साम्राज्य पसरलेले असते. रात्र सरत जाते तसा गुंता सुटत जातो आणि हडसन नदीवर सूर्याचे प्रथम किरण पडता-पडता सर्व काही आलबेल होते आणि वाचक सुटकेचा नि:श्वास टाकतो. एका रात्रीत घडणारे हे कथानक वाचून होईपर्यंत हातातून खाली ठेववत नाही. कथेच्या ओघात लेखिकेने न्यूयॉर्क शहराचे, तेथील तरुणाईचे सुंदर वर्णन केले आहे. वाचकही मार्गारीटाचा आस्वाद घेता-घेता ‘स्टँड अप’ कॉमेडीचा एखादा शो बघण्यासाठी न्यूयॉर्कला जाण्याच्या मोहात पडतो.
पण फ्रॅंक विवामध्ये गुंतत जातो आणि स्वत:च्या स्वाभिमानाची, स्वच्छंदी जगण्याची आस असलेली विवा त्याच्यात गुंतूनही त्याला झिडकारत राहते. भारतात उतरल्यानंतरचं सगळ्यांचं जगणं, भारतात त्यांना येणारे वेगवेगळे अनुभव, त्यांचं हळूहळू बदलत गेलेलं आयुष्य आणि ते एकमेकांशी शेअर करण्याची त्यांची आच या सगळ्यांतून ही कादंबरी एक विलोभनीय दुनिया आपल्यासमोर उभी करते. एरवी आपण तत्कालीन ब्रिटिशांकडे राज्यकर्ते या एकाच नजरेने पाहतो पण या राज्यकर्त्या वर्गातले वेगवेगळे थर, त्यांचे प्रश्न, त्यांचं जगणं हे सगळं कसं होतं ते या कादंबरीमुळे आपल्याला काचेच्या त्या बाजूकडून समजतं.बॉम्बेमधील उच्चभ्रू समाज, गरीब वस्त्या, भारतातले इंग्रज, त्यांची भारताबद्दलची मते, तत्कालीन भारतीय समाजाची इंग्रजांबद्दलची मते, भारतीय स्वातंत्र्यलढा अशा व्यापक पाश्र्वभूमीवर विणलेला हा कादंबरीचा पट खिळवून ठेवतो.