मुखपृष्ठ
काहूर

माझे शेल्फ

काहूर

इंग्रजी शीर्षक
Kahur
सारांश

संवेदना बधिर करणारे ‘काहुर’... ‘द रोड टू वॉटिंग’ ही वेण्डी लॉऱ्योन यांची मूळ इंग्रजी सत्यकथा चित्रा वाळिंबे यांनी ‘काहूर’मध्ये अनुवादित केली आहे. ब्रह्मदेशातील अल्पसंख्याक ‘जंगली लू’ जमातीतील ‘ना गा’ची ही कहाणी आपले हृदय पिळवटून टाकते. मूळ कथानकाची ावगर्भता हळुवारपणे जपण्याचा चित्र वाळिंबे यांनी कसोशीने प्रयत्न केला आहे. कथेची नायिका ‘ना गा’ आत्मशोध घेत आहे. या शोधात ती हरवून गेली आहे. मार्ग सापडत नाही. परिस्थितीने गांजून गेलेली आत्महत्येचा अयशस्वी प्रयत्नही करू जाते. कुनमिंग ते वॉटिंग. वॉटिंग ते बँकॉक आणि बँकॉक ते पुन्हा कुनमिंग असा तिचा झगडा चालला आहे. मॉर आणि फॉर आणि छोटी सवंगडी पिया हा तिच्या आयुष्यातील पहिला सुखाचा पडाव. डो-डो सेंग ही एक आश्वासक झुळूक. नशिबाचा फेरा ‘ना गा’ला कोणकोणत्या दुष्टचक्रातून फिरवतो आणि तिला कसे फसवले जाते हे वाचून मन सुन्न होते. विल हा ‘देवदूत’ पण त्याच्या सहवासातही भूतकाळातल्या गडद सावल्या तिची पाठ सोडत नाहीत. त्या छायेत ती कधीच मोकळा श्वास घेऊ शकत नाही. कायम कोंडलेल्या ‘ना गा’ची पावले चुकीची पडतात आणि ती पेâकली जाते. पुन:पुन्हा अनिश्चिततेच्या गर्तेत. डो-डो सेंग विल. मोल. जियांग ही सारी जीव लावणारी माणसे. मिन्झू छोटी आहे, निरागस आहे. पण ती ‘मा’ची काळजी करते आहे. त्यासाठी ‘नको’ ते धाडस करायला धजते आहे. तिच्या काळजीने ‘ना गा’चा जीव अर्धा होतो. अखेर सीमा पार करूनही काय मिळवायचे, कुठे जायचे हे प्रश्नचिन्ह कायम ठेवूनच कादंबरीचा शेवट येतो. आपले मूळ आणि कूळ शोधत जायचे तिथे कोणीच नाही. हे माहीत असताना आणि मग होणारे भास हे चित्र भेसूर आहे. पण ही कादंबरी नीट जाणून घेण्यासाठी चीन व बर्मामधील या अत्याचारांची सामाजिक व ऐतिहासिक पार्श्वभूमी माहीत असेल तर नक्कीच मदत होईल. ‘काहूर’च्या निमित्ताने आपण एका वेगळ्या देशातून आणि वेगळ्या संस्कृतीमधून प्रवास करतो. जी गूढ आहे, कधी हळवी. तर कधी व्रूâर आहे. साहित्यातून संवेदनशीलता वृद्धिंगत करणारी ‘काहूर’ वाचूनच घ्यायचा अनुभव आहे.

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
समुदायाने जोडले
बंद